

Rohit Sharma viral video :
नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा 'हिटमॅन' रोहित शर्मा मैदानावर जेवढा आक्रमक असतो, तेवढाच तो मैदानाबाहेर मनमिळाऊ आणि हसऱ्या स्वभावाचा आहे. सध्या त्याचा असाच एक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
रोहित शर्माचा व्हायरल व्हिडिओ त्यांच्या वर्कआउट सेशन दरम्यानचा असल्याचे सांगितले जात आहे. वर्कआउट करत असताना रोहितने जेव्हा खोलीच्या खिडकीतून बाहेर पाहिले, तेव्हा त्याला एक नवविवाहित जोडपे त्यांचे वेडिंग फोटोशूट करत असलेले दिसले. हे पाहताच रोहितच्या डोक्यात एक कल्पना आली. त्याने लगेच आपल्या स्पीकरवर भारतातील लग्नांमध्ये वाजणारे प्रसिद्ध गाणे 'आज मेरे यार की शादी है' लावले. गाणे लावण्यासोबतच त्याने खिडकीजवळ उभे राहून डान्स देखील केला.
एका मोठ्या क्रिकेटपटूला आपल्या लग्नाच्या फोटोशूटच्या वेळी अचानक डान्स करताना पाहून वधू-वरांना खूप आनंद झाला. ज्या रोहित शर्माला भेटायला चाहते गर्दी करतात, त्याने स्वतःहून अशाप्रकारे शुभेच्छा दिल्यामुळे त्यांच्यासाठी हे एक मोठं 'गिफ्ट' होतं. हा आमच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असल्याची या जोडप्याने प्रतिक्रिया दिली आहे.
सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील आगामी वनडे मालिकेसाठी रोहित तयारी करत आहे, पण या तयारीदरम्यानचा त्याचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.