Rashid Khan T20 Record: आजपर्यंत कोणालाही जमलं नाही ते काम राशिद खानने केलं; टी २० मध्ये अफगाणी बादशाहत

गुरूवारी शारजाहमध्ये झिम्बाब्वेविरूद्धच्या सामन्यात राशिद खानने तदिवानाशे मारूनमनी याची विकेट घेतली अन् इतिहास रचला.
Rashid Khan T20 Record
Rashid Khan T20 Recordpudhari
Published on: 
Updated on: 

Rashid Khan T20 Record: अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशिद खानने टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक असा कारनामा केला जो कारनामा आतापर्यंत कोणताही गोलंदाज करू शकलेला नाही. राशिद खान टी २० क्रिकेटमध्ये २०० विकेट्स पूर्ण करणारा जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे. गुरूवारी शारजाहमध्ये झिम्बाब्वेविरूद्धच्या सामन्यात राशिद खानने तदिवानाशे मारूनमनी याची विकेट घेतली अन् त्याने हा इतिहास रचला.

Rashid Khan T20 Record
Rashid Khan Crime News | राशीद खान हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार गयासुद्दीन वारसी पोलिसांच्या जाळ्यात; कोर्टात शरण येताच अटक!

राशीदने गाठला २०० विकेट्सचा टप्पा

राशिद खानने ऑक्टोबर २०१५ मध्ये झिम्बब्वेविरूद्ध टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण केलं होतं. सप्टेंबर २०२५ मध्ये तो टी २० मधील एक यशस्वी गोलंदाज झाला आहे. त्यावेळी त्याने टीम साऊदीला मागे टाकले होते. आता त्याने २०० विकेट्सचा टप्पा गाठून टी २० क्रिकेटमध्ये आपला दबदबा पुन्हा एकदा सिद्ध केला. टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर इंग्लंडचा आदिल राशिद असून त्याने १७१ विकेट्स घेतल्या आहेत.

Rashid Khan T20 Record
Rashid Khan On Kabul Airstrike: रमजानचा महिना.. हल्ला मुद्दाम केला, चुकून झाला तरी... पाकच्या हल्ल्यानंतर राशीद स्पष्टच बोलला

अजून एक विक्रम

अफगाणिस्तान अन् झिम्बाब्वे विरूद्धच्या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर अजमतुल्लाह उमरजाई आणि इजाज अहमद या दोघांनी देखील विक्रमी कामगिरी केली आहे. दोघांनी सहाव्या विकेटसाठी १४२ धावांची भागीदारी रचली.

आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमध्ये आतापर्यंत सहाव्या विकेटसाठी केलेली ही सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे. यापूर्वी आंद्रे रसेल आणि शेरफेन रदरफोर्ड यांनी सहाव्या विकेटसाठी १३९ धावांची विक्रमी भागीदारी रचली होती. आता हे रेकॉर्ड अफगाणी जोडीनं मोडलं आहे.

झिम्बाब्वेचीही कडवी झुंज

विशेष म्हणजे उमरजाई आणि अहमद यांनी केलेली ही भागीदारी अफगाणिस्तानकडून करण्यात आलेली सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे. यापूर्वी मोहम्मद नबी आणि इब्राहिम जादरान यांनी या विकेटसाठी ८६ धावांची भागीदारी रचली होती.

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करत ७ विकेट्सच्या मोबदल्यात २२१ धावा केल्या होत्या. उमरजाईने ५० चेंडूत ११६ धावा केल्या. तर अहमदने २७ चेंडूत ५७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेने देखील जोरदार खेळ केला. मात्र त्यांना २० षटकात ५ बाद २०२ धावा करता आल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.