Rohit Sharma Padma Shri: हरमनप्रीत आता 'पद्मश्री'...मात्र रोहित शर्माने अजून पद्म पुरस्कार का स्विकारला नाही?

Rohit Sharma Padma Shri
Rohit Sharma Padma Shripudhari
Published on
Updated on

Rohit Sharma Padma Shri: रविचंद्रन अश्विनला २०२५ मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला. या वर्षी रोहित शर्मा आणि हरमनप्रीत कौर या दोन भारतीय क्रिकेटपटूंना पद्म पुरस्कार मिळाला आहे. भारतीय क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने राष्ट्रपती द्रौपदी मुरमू यांच्या हस्ते हा नागरी पुरस्कार स्विकारला. २५ मे रोजी राष्ट्रपती भवनमध्ये हा सोहळा पार पडला. मात्र या सोहळ्याला रोहित शर्मा उपस्थित नव्हता. त्याला देखील पद्म पुरस्काराची घोषणा झाली आहे. मात्र तो सोहळ्याला उपस्थित नव्हता.

Rohit Sharma Padma Shri
Padma Awards 2026 | महाराष्ट्रातील 8 मान्यवरांचा ‌‘पद्म‌’ सन्मान

रोहितनं पुरस्कार सोहळा स्कीप केला?

रोहित शर्मा पद्म पुरस्कार घेण्यासाठी का आला नाही याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली. सर्वांना रोहित पद्म पुरस्कार सोहळा कसा काय स्कीप करू शकतो असा प्रश्न पडला होता. पडद्यामागे काय हालचाली सुरू आहेत अशी देखील शंका नेटकऱ्यांनी विचारली.

सर्वात आधी रोहित शर्माने पद्म पुरस्कार नाकारलेला नाही. त्याला अजूनही पद्म पुरस्कार मिळू शकतो. मात्र या सोहळ्यावेळी त्याला तो घेता आला नाही इतकंच.

Rohit Sharma Padma Shri
Sansad Ratna Award 2026: 12 खासदारांना ‌‘संसदरत्न‌’ सन्मान, महाराष्ट्राला सर्वाधिक पाच पुरस्कार

नंतर रोहित स्विकारणार पुरस्कार

भारत सरकार पद्म पुरस्कार वितरण सोहळा अनेक टप्प्यात करत असते. राष्ट्रपती भवन यासाठी वेगवेगळ्या तारखा जाहीर करत असते. पद्म पुरस्कार वितरण हे दोन बॅचमध्ये विभागले आहेत. हरमनप्रीत कौरला पहिल्या बॅचमध्ये हा पुरस्कार मिळाला. तिने सोहळ्याला उपस्थिर राहून तो राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला. रोहित शर्माला आता दुसऱ्या फेजमध्ये हा पुरस्कार मिळणार आहे.

हरमनप्रीत कौरने महिला वनडे वर्ल्डकप जिंकणाऱ्या पहिल्या वहिल्या संघाचे नेतृत्व केले आहे. दक्षिण अफ्रिकेला पराभूत करून भारतीय संघाने नवी मुंबईत ही ऐतिहासिक कामगिरी केली होती.

Rohit Sharma Padma Shri
Pune Bal Gandharva Award: बालगंधर्व पुरस्कार रखडले; 2020-21 चे सन्मान अजूनही प्रलंबित

रोहितने यापूर्वी पद्म पुरस्कार जाहीर झाल्यानंतर याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली होती. भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा हा मर्यादित षटकांच्या क्रिकेट इतिहासातील एक सर्वात यशस्वी कर्णधार आणि खेळाडू आहे. त्याच्या नेतृत्वाखालीच भारताने २०२५ ची आयसीसी ट्रॉफी जिंकली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news