IPL 2026 Prize Money: RCB वर 20 कोटींचा वर्षाव! विराटला फक्त 5 लाख? वैभव सूर्यवंशीला किती लाख मिळाले? पुरस्कारांची संपूर्ण यादी

IPL 2026 Prize Money: RCB ने गुजरात टायटन्सचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा IPL विजेतेपद जिंकले आणि 20 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळवली.
IPL 2026 Prize Money
IPL 2026 Prize MoneyPudhari
Published on
Updated on

IPL 2026 Prize Money: IPL 2026 च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) गुजरात टायटन्सचा 5 विकेट्सने पराभव करत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. या ऐतिहासिक विजयासह RCB वर बक्षिसांचा अक्षरशः पाऊस पडला आहे. मात्र, संपूर्ण हंगामात आपल्या विस्फोटक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीनेही पुरस्कारांच्या बाबतीत मोठी कमाई केली.

विजेतेपद जिंकणाऱ्या RCB संघाला 20 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळाली. तर अंतिम सामन्यात पराभूत झालेल्या गुजरात टायटन्सला 12.5 कोटी रुपये मिळाले.

या हंगामातील सर्वात मोठा स्टार ठरलेल्या वैभव सूर्यवंशीने अनेक वैयक्तिक पुरस्कार आपल्या नावावर केले. त्याने ऑरेंज कॅप, मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर, इमर्जिंग प्लेयर ऑफ द सीझन, सुपर स्ट्रायकर ऑफ द सीझन आणि सर्वाधिक षटकारांचा पुरस्कार जिंकला. या सर्व पुरस्कारांसह त्याला Sierra कार आणि एकूण 45 लाख रुपयांहून अधिक बक्षीस रक्कम मिळाली.

IPL 2026 Prize Money
Virat Kohli Viral Video: विराटचा विजयी षटकार आणि अनुष्कासाठी खास ‘फ्लाइंग किस’; रोमँटिक क्षण झाला व्हायरल

वैभव सूर्यवंशीला 'मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर ऑफ द सीझन'साठी 15 लाख रुपये, ऑरेंज कॅपसाठी 10 लाख रुपये, 'इमर्जिंग प्लेयर ऑफ द सीझन'साठी 10 लाख रुपये आणि सर्वाधिक षटकारांसाठी आणखी 10 लाख रुपये देण्यात आले. याशिवाय 'सुपर स्ट्रायकर ऑफ द सीझन' म्हणून त्याला Sierra कारही मिळाली.

पर्पल कॅप गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाने जिंकली. त्याला 10 लाख रुपयांचे बक्षीस मिळाले. सर्वाधिक डॉट बॉल टाकणाऱ्या मोहम्मद सिराजलाही 10 लाख रुपये देण्यात आले. सर्वाधिक चौकार मारणाऱ्या साई सुदर्शनला 10 लाख रुपये, तर 'कॅच ऑफ द सीझन'साठी मनीष पांडे याला 10 लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले.

अंतिम सामन्यात 42 चेंडूत 75 धावांची दमदार खेळी करून RCB ला विजेतेपद मिळवून देणाऱ्या विराट कोहलीला 'प्लेयर ऑफ द फायनल' पुरस्कार मिळाला. त्यासाठी त्याला 5 लाख रुपयांची रक्कम देण्यात आली.

IPL 2026 Prize Money
RCB IPL Final: RCB चा मास्टरप्लॅन! 'विराट' रणनीतीपुढे गुजरात हतबल; फायनल कशी जिंकली? काय होता गेम प्लॅन?

फायनलमध्ये प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सला RCB च्या गोलंदाजांनी 20 षटकांत 155 धावांवर रोखले. शुभमन गिल आणि साई सुदर्शन लवकर बाद झाल्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने नाबाद 50 धावांची झुंजार खेळी करत संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली.

156 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विराट कोहली आणि वेंकटेश अय्यर यांनी RCB ला दमदार सुरुवात करून दिली. मधल्या फळीत काही विकेट्स झटपट पडल्या तरी विराटने संयम आणि आक्रमकता यांचा सुंदर मिलाफ साधत 75 धावांची मॅच-विनिंग खेळी केली. अखेरीस विजयी षटकार ठोकत त्याने RCB ला सलग दुसऱ्या विजेतेपदापर्यंत पोहोचवले.

IPL 2026 मध्ये RCB ने इतिहास रचला असला, तरी वैभव सूर्यवंशीने आपल्या धडाकेबाज कामगिरीने भविष्यातील भारतीय क्रिकेटचा नवा सुपरस्टार म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news