Controversy : ‘माझा पती सात्विक, बाकीचे खेळाडू विदेशात जाऊन नशा...’, रिवाबा जडेजाचा भारतीय खेळाडूंवर आरोप; VIDEO व्हायरल

Ravindra Jadeja wife Rivaba : जडेजाच्या पत्नीचा जुना व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर क्रिकेट विश्वात खळबळ
Controversy : ‘माझा पती सात्विक, बाकीचे खेळाडू विदेशात जाऊन नशा...’, रिवाबा जडेजाचा भारतीय खेळाडूंवर आरोप; VIDEO व्हायरल
Published on
Updated on

ravindra jadeja wife rivaba controversy allegations on team india cricketers

जामनगर : भारतीय क्रिकेट संघाचा आधारस्तंभ आणि अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा यांची पत्नी तसेच गुजरातच्या मंत्री रिवाबा जडेजा यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात मोठे आणि धक्कादायक विधान करून क्रिकेट जगतात मोठी खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी थेट भारतीय संघातील खेळाडूंवर विदेशात जाऊन ‘चुकीची कामे’ करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. रिवाबा यांच्या या टिप्पणीमुळे सोशल मीडियावर प्रतिक्रियांचे वादळ उठले आहे.

दरम्यान, त्यांनी हे विधान सुमारे एक महिन्यापूर्वी एका सामाजिक समारंभात केले होते. हे जुने विधान आता नव्याने व्हायरल होत असल्यामुळे क्रिकेट वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.

टीम इंडियावर थेट निशाणा! रिवाबा काय म्हणाल्या होत्या?

कार्यक्रमात रिवाबा जडेजा आपल्या पतीच्या सचोटीचे आणि शिस्तीचे कौतुक करत होत्या. याचवेळी त्यांनी अचानक बाकीच्या भारतीय खेळाडूंवर सनसनाटी आरोप केले. रिवाबा यांनी सांगितले की, रवींद्र जडेजा लंडन, दुबई, ऑस्ट्रेलिया अशा जगातील अनेक देशांमध्ये खेळायला जातात, पण ते कधीही कोणत्याही चुकीच्या सवयी किंवा व्यसनाच्या आहारी गेले नाहीत.’ यानंतर, त्यांनी थेट भारतीय खेळाडूंकडे बोट दाखवले आणि म्हणाल्या, ‘टीमचे बाकीचे सगळे खेळाडू विदेशात जाऊन चुकीची कामे करतात,’ असा धक्कादायक दावा केला.

Controversy : ‘माझा पती सात्विक, बाकीचे खेळाडू विदेशात जाऊन नशा...’, रिवाबा जडेजाचा भारतीय खेळाडूंवर आरोप; VIDEO व्हायरल
IND vs SA T20 : ऐतिहासिक विक्रमाकडे हार्दिकची वाटचाल..! द. आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या T20 मध्ये 'हा' इतिहास घडणारच

रिवाबा जडेजा यांच्या या विधानाने सर्वांनाच धक्का बसला आहे, कारण हा आरोप थेट टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममधील संस्कृती आणि शिस्तीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभा करणारा आहे, असे अनेकांचे म्हणणे आहे. रिवाबा यांनी पुढे स्पष्ट केले की, जडेजा यांनाही हवे असल्यास ते तसे करू शकतात आणि त्यासाठी त्यांना कोणाला विचारण्याची गरज नाही. मात्र, ते आपली जबाबदारी ओळखतात आणि नेहमी योग्य शिस्तीत राहतात.

जुने विधान अचानक चर्चेत का?

रिवाबा जडेजा यांनी केलेले हे विधान सुमारे एका महिन्यापूर्वीचे आहे. तथापि, नुकतेच त्या गुजरातच्या शिक्षण मंत्री बनल्या आहेत आणि त्यांच्या राजकीय सक्रियतेमुळे त्या सतत चर्चेत आहेत. त्यांच्या याच राजकीय पार्श्वभूमीमुळे, त्यांचे जुने व्हिडिओ आणि विधाने पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामुळे हा वाद नव्याने उफाळून आला आहे.

Controversy : ‘माझा पती सात्विक, बाकीचे खेळाडू विदेशात जाऊन नशा...’, रिवाबा जडेजाचा भारतीय खेळाडूंवर आरोप; VIDEO व्हायरल
IND vs SL Smriti Mandhana : कटू ‘स्मृती’ विसरून ‘मानधना’ पुन्हा उतरणार मैदानात! श्रीलंकेला टी-20 मालिकेतून धूळ चारण्यासाठी सज्ज

चाहत्यांमध्ये मोठी चर्चा

रिवाबा जडेजा यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर तत्काळ प्रतिक्रियांचा पूर आला. रिवाबा यांनी याआधीही काही वादग्रस्त विधाने केली आहेत, पण यावेळी त्यांनी थेट भारतीय खेळाडूंवर आरोप केल्यामुळे हे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. त्यांच्या या विधानानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) किंवा खेळाडू काय प्रतिक्रिया देतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

आयपीएलमध्ये जडेजा नव्या संघात

दरम्यान, रिवाबा यांच्या या वादग्रस्त विधानादरम्यान क्रिकेटशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. रवींद्र जडेजा आयपीएल २०२६ मध्ये राजस्थान रॉयल्स संघाच्या जर्सीत दिसणार आहेत. मागील हंगामापर्यंत चेन्नई सुपर किंग्जचा भाग असलेला जडेजा एका मोठ्या 'ट्रेड'मध्ये राजस्थान रॉयल्स संघात परतला आहे. विशेष म्हणजे, २००८ मध्ये जडेजाने आयपीएलमध्ये पदार्पणही राजस्थान रॉयल्सकडूनच केले होते. त्यामुळे, एकप्रकारे त्याची पहिल्या फ्रँचायझीमध्ये 'घरवापसी' झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news