

rashid khan new record became second asian captain to take 50 wickets in t20i cricket
शारजा : अफगाणिस्तानचा लेग-स्पिनर राशिद खानने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला आहे. तो आता सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला आहे. त्याने न्यूझीलंडच्या टिम साउदीला मागे टाकून हा विक्रम आपल्या नावावर केले आहे. साउदीने 126 सामन्यांमध्ये 164 बळी घेतले होते, तर राशिदने केवळ 98 सामन्यांत 165 बळी घेण्याची किमया केली आहे.
राशिद खान : 165 बळी
टिम साउदी : 164 बळी
ईश सोढी : 150 बळी
शाकिब अल हसन : 149 बळी
मुस्तफिजुर रहमान : 142 बळी
हे यश राशिदने शारजा येथे संयुक्त अरब अमिराती (UAE) विरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात मिळवले. या सामन्यात त्याने 4 षटकांत 21 धावा देऊन 3 बळी घेतले.
या सामन्यात राशिदने कर्णधार म्हणून टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 बळी पूर्ण केले. असा पराक्रम करणारा तो जगातील पाचवा कर्णधार ठरला आहे. या आधी केवळ चार कर्णधारांनी 50 किंवा त्याहून अधिक बळी घेतले होते. या कामगिरीमुळे, टी-20 क्रिकेटमध्ये 50 किंवा त्याहून अधिक बळी घेणारा तो दुसरा आशियाई कर्णधार ठरला आहे. कुवेतचा मोहम्मद अस्लम या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने कर्णधार म्हणून 76 बळी घेतले आहेत.
83 बळी : चार्ल्स पर्चर्ड (जर्सी)
76 बळी : मोहम्मद असलम (कुवेत)
58 बळी : क्लिंटन रुबागुम्या (रवांडा)
54 बळी : गेरहार्ड इरास्मस (नामिबिया)
52 बळी : राशिद खान (अफगाणिस्तान)
केवळ आंतरराष्ट्रीयच नव्हे, तर एकूणच टी-20 क्रिकेटमध्येही राशिद खान सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. जगभरातील विविध लीगमध्ये त्याने आपल्या गोलंदाजीची ताकद दाखवून दिली आहे. वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी त्याने टी-20 क्रिकेटमध्ये ६६४ बळी घेतले आहेत, आणि आगामी काळात तो 1000 बळींचा टप्पाही गाठू शकतो.