Rajat Patidar SMAT 2026: 13 षटकार आणि 8 चौकार! रजत पाटीदारची ऐतिहासिक खेळी; 48 चेंडूंत ठोकल्या नाबाद 135 धावा

Rajat Patidar SMAT 2026: रजत पाटीदारने सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीमध्ये आसामविरुद्ध अवघ्या 48 चेंडूंत नाबाद 135 धावांची ऐतिहासिक खेळी केली.
Rajat Patidar SMAT 2026
Rajat Patidar SMAT 2026Pudhari
Published on: 
Updated on: 

Rajat Patidar SMAT 2026: आयपीएलमध्ये आपल्या आक्रमक फलंदाजीने ओळख निर्माण करणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) कर्णधार रजत पाटीदार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आपल्या वादळी फलंदाजीच्या जोरावर त्याने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीमध्ये खेळताना पाटीदारने अवघ्या 48 चेंडूंत नाबाद 135 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे मध्य प्रदेशच्या संघाने मोठी धावसंख्या उभारली.

2026 च्या सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीमध्ये मध्य प्रदेश आणि आसाम यांच्यात सामना खेळण्यात आला. न्यू चंदीगडमधील मुल्लानपूर येथे झालेल्या या सामन्यात रजत पाटीदारने पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात प्रवेश केला. सुरुवातीपासूनच त्याने आक्रमक फलंदाजी केली. आसामच्या गोलंदाजांचा समाचार घेत त्याने चौकार आणि षटकारांची अक्षरशः बरसात केली.

पाटीदारने अवघ्या 41 चेंडूंत आपले शतक पूर्ण केले. त्यानंतरही त्याची फटकेबाजी सुरूच राहिली. त्याने 48 चेंडूंत 8 चौकार आणि 13 षटकारांच्या मदतीने नाबाद 135 धावा केल्या. या खेळीसह त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मध्य प्रदेशकडून शतक झळकावणारा पहिला फलंदाज होण्याचा विक्रम केला.

Rajat Patidar SMAT 2026
Gold Silver Price Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण; आठवडाभरात 24 कॅरेट सोनं 5,950 रुपयांनी स्वस्त

या सामन्यात मध्य प्रदेशने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 गडी गमावून 250 धावांचा डोंगर उभा केला. रजत पाटीदारशिवाय शिवांग कुमारनेही दमदार फलंदाजी केली. त्याने 61 धावांचे योगदान दिले. अक्षत रघुवंशीने 19, अंकुश सिंहने 23, अपूर्वे द्विवेदीने 3, त्रिपुरेश सिंहने शून्य, तर अनिकेत वर्माने 1 धाव केली.

Rajat Patidar SMAT 2026
Viral Video:स्टार खेळाडूंचा देशी अंदाज! जमिनीवर मांडी घालून मटणावर ताव; सूर्यकुमार-सरफराजच्या साधेपणाने जिंकली चाहत्यांची मने

रजत पाटीदारच्या या वादळी खेळीमुळे मध्य प्रदेशने आसामसमोर मोठे आव्हान उभे केले. आयपीएलमधील आपल्या आक्रमक फलंदाजीची झलक पाटीदारने पुन्हा एकदा देशांतर्गत क्रिकेटमध्ये दाखवून दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.