Viral Video:स्टार खेळाडूंचा देशी अंदाज! जमिनीवर मांडी घालून मटणावर ताव; सूर्यकुमार-सरफराजच्या साधेपणाने जिंकली चाहत्यांची मने

Suryakumar Yadav Sarfaraz Khan viral video : व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video:स्टार खेळाडूंचा देशी अंदाज! जमिनीवर मांडी घालून मटणावर ताव; सूर्यकुमार-सरफराजच्या साधेपणाने जिंकली चाहत्यांची मने
Published on: 
Updated on: 

Suryakumar Yadav Sarfaraz Khan viral video : मैदानावर तुफानी फटकेबाजीने भल्याभल्या गोलंदाजांना धडकी भरवणारा सूर्यकुमार यादव आणि सरफराज खान यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. दोघेही जमिनीवर खाली बसून अस्सल घरगुती जेवणाचा आनंद घेतल्याचे या व्हिडिओत दिसत आहे.

जमिनीवर मांडी घालून जेवणाचा आस्वाद

या व्हिडिओत दोन्ही स्टार खेळाडू अंगावर मुंबई संघाची जर्सी घातलेल्या अवस्थेत, अगदी साध्या वातावरणात जमिनीवर मांडी घालून जेवणाचा आस्वाद घेताना दिसत आहेत. सामान्य माणसांसारखे खाली बसून ते जेवणाचा आनंद घेत आहेत आणि आजूबाजूच्या उपस्थितांशी गप्पा मारत आहेत.

Viral Video:स्टार खेळाडूंचा देशी अंदाज! जमिनीवर मांडी घालून मटणावर ताव; सूर्यकुमार-सरफराजच्या साधेपणाने जिंकली चाहत्यांची मने
Aryavir Sehwag : पाकिस्तानी फॅन्सनी दिल्या वीरेंद्र सहवागच्या नावानं घोषणा! आर्यवीरने शेअर केला वडिलांसोबत 'तो' किस्सा

माणिककडून मटणाची खास मेजवानी

व्हिडिओमध्ये सूर्यकुमार यादव सांगत आहे की, समोर बसलेल्या माणिकने ही मटणाची खास मेजवानी तयार केली आहे. हे जेवण अस्सल घरगुती आणि पारंपरिक असल्याचेही तो सांगतो. यावेळी सरफराज खानही मटणावर यथेच्छ ताव मारताना दिसतोय. जेवण इतके अप्रतिम झाले होते की, बोलण्यापेक्षा फक्त खातच राहावेसे वाटतेय, अशी मजेशीर प्रतिक्रियाही सरफराज देतोय.

Viral Video:स्टार खेळाडूंचा देशी अंदाज! जमिनीवर मांडी घालून मटणावर ताव; सूर्यकुमार-सरफराजच्या साधेपणाने जिंकली चाहत्यांची मने
Mohit Ulva U-19 Asia Cup : शेवटच्‍या चेंडूवर पाकिस्‍तानला पाकिस्तानला धूळ चारणार्‍या मोहित उल्‍वाला मिळाले मोठे बक्षीस

मुंबई संघाची 'सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी'मध्ये दमदार सुरुवात

हा व्हिडिओ अशा वेळी समोर आला आहे, जेव्हा मुंबई संघाने शनिवारी आपल्या 'सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी' मोहिमेची दणक्यात सुरुवात केली. मात्र, हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे आणि तो कुणी शेअर केला, याबाबतची स्पष्ट माहिती अद्याप समोर आलेली नाही. तरीही या खेळाडूंचा हा साधेपणा चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

Viral Video:स्टार खेळाडूंचा देशी अंदाज! जमिनीवर मांडी घालून मटणावर ताव; सूर्यकुमार-सरफराजच्या साधेपणाने जिंकली चाहत्यांची मने
India vs New Zealand :वनडे वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाची चिंता वाढली ! विराट आणि रोहितची न्यूझीलंडमधील अखेरची खेळीही ठरली अपयशी

मैदानावरही सूर्यकुमारची चमकदार कामगिरी

एका बाजूला हा व्हिडिओ चर्चेत असतानाच, दुसरीकडे सूर्यकुमार यादवने मैदानावरही आपल्या फलंदाजीची जादू दाखवली. कोलकात्यात हैदराबादविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात सूर्यकुमारने अवघ्या २१ चेंडूत नाबाद ६० धावांची तुफानी खेळी केली. मुंबईच्या कर्णधाराने आपल्या या खेळीत ६ चौकार आणि ५ षटकार ठोकले, तसेच अवघ्या १५ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. सूर्यकुमारच्या या धडाकेबाज खेळीच्या बळावर मुंबईने १७३ धावांचे लक्ष्य केवळ १३.१ ओव्हरमध्ये पार करत ७ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. विशेष म्हणजे, सरफराजचा लहान भाऊ मुशीर खाननेही २१ चेंडूत ५१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, तर सरफराजला या सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.