NZ vs IND : फिलिप्स, मिचेलने सामना वाचवला, मात्र WTC Point Table मध्ये किवींचा डाव गंडला; भारताची परिस्थिती काय?

India vs New Zealand 1st Test: या ड्रॉचा दोन्ही देशांच्या WTC पॉईंट टेबलमधील गुण आणि विनिंग पर्सेंटेजवर परिणाम झाला आहे.
NZ vs IND WTC Point Table
NZ vs IND WTC Point Tablepudhari
Published on: 
Updated on: 

NZ vs IND WTC Point Table: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना वेलिंगटनमध्ये खेळवला गेला. हा सामना ड्रो झाला असून या ड्रॉचा दोन्ही देशांच्या WTC पॉईंट टेबलमधील गुण आणि विनिंग पर्सेंटेजवर परिणाम झाला आहे. यजमान न्यूझीलंड टॉप २ मधून बाहेर फेकला गेला आहे. तर भारताच्या टक्केवारीत देखील बदल झाला आहे.

NZ vs IND WTC Point Table
India vs New Zealand 1st Test : डॅरिल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स यांनी हिरावली भारताची विजयाची संधी; वेलिंग्टन कसोटी 'ड्रॉ'

चौथ्या दिवशीचा खेळ संपला त्यावेळी भारताने न्यूझीलंडचे २ फलंदाज तंबूत पाठवले होते. त्यामुळे सामन्यावर भारताची पकड होती. मात्र पाचव्या दिवशी किवींच्या फलंदाजांनी दमदार फलंदाजी करत भारताची ही पकड हळू हळू सैल करत सामना बरोबरीत सोडवण्याच्या दिशेने कूच केली. पाचव्या दिवशी तिसऱ्या सत्राचा खेळ संपत आला तरी भारताला फक्त तीनच किवींना तंबूत धाडता आलं होतं. ग्लेन फिलिप्स आणि डॅरेल मिचेल यांनी भारताच्या तोडून विजयाचा घास हिरावला. न्यूझीलंडने दुसऱ्या डावात ५ बाद २३९ धावा केल्या.

NZ vs IND WTC Point Table
WTC 2027 Final : वाँडरर्समध्ये दक्षिण अफ्रिकेचा दणदणीत विजय अन् वेलिंगटमध्ये टीम इंडियाचे धाबे दणाणले; Point Table बदललं

WTC Point Table लेटेस्ट अपडेट

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना झाल्यानंतर WTC पॉईंट टेबलमध्ये न्यूझीलंड दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. त्यांचे विनिंग पर्सेंटेज हे आता ६६.६७ टक्के झाले आहे. तर भारताला देखील या ड्रॉचा काही फायदा झालेला नाही. जरी या ड्रॉ सामन्यामुळे भारताच्या गुणतालिकेतील स्थानाला कोणता धक्का लागला नसला तरी भारताच्या विनिंग पर्सेंटेजमध्ये देखील घट झाली आहे. आता भारताचे विनिंग पर्सेंटेज ५० टक्क्यांवर आलं आहे. भारताला हा मोठा झटका असून आता दक्षिण अफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत.

NZ vs IND WTC Point Table
Ind vs NZ Test : वेलिंग्टनमध्ये टीम इंडियाने रचला धावांचा 'डोंगर'! मोडले अनेक ऐतिहासिक विक्रम; पंतबरोबर बुमराहचाही धमाका

११ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं

११ वर्षात पहिल्यांदात भारतीय संघासोबत ही बाब घडली आहे. ११ वर्षात पहिल्यांदाच भारताने सलग दोन कसोटी ड्रॉ केल्या आहेत. न्यूझीलंडविरूद्धच्या वेलिंगटन कसोटी खेळण्यापूर्वी भारतीय संघाने श्रीलंका दौऱ्यावर शेवटचा सामना ड्रॉ केला होता. भारतीय संघचे सध्याच्या wtc सायकलमध्ये तीन सामने अनिर्णित झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.