

ऑस्ट्रेलियन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत आज सर्बियाचा अनुभवी नोव्हाक जोकोव्हिच व स्पेनचा कार्लोस अल्काराझ आमने-सामने भिडणार असून यात अनुभव जिंकणार की तरुणाईचा जोश हे या लढतीच्या माध्यमातून अधोरेखित होईल.
तब्बल 5 तास 27 मिनिटाची ग्रँडस्लॅम इतिहासातील सर्वात प्रदीर्घ सेमीफायनल जिंकणार्या कार्लोस अल्काराझने फायनलमध्ये धडक मारताना आपले आव्हान तगडे असेल, याचीच जोरदार प्रचिती दिली आहे.
सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच येथे आपल्या कारकिर्दीतील 25 व्या ग्रँडस्लॅम जेतेपदासाठी निर्धाराने कोर्टवर उतरेल. येथे जेतेपद मिळवल्यास तो मार्गारेट कोर्टचा 24 ग्रँडस्लॅम जेतेपदाचा विक्रम मागे टाकेल.
कार्लोस अल्काराझ (स्पेन)
वय : 22
मानांकन : 1
करियर टायटल्स : 24
ग्रँडस्लॅम टायटल्स : 6
कारकिर्दीतील विजय/पराभव : 280/65
नोव्हाक जोकोव्हिच (सर्बिया)
वय : 38
मानांकन : 4
करियर टायटल्स : 101
ग्रँडस्लॅम टायटल्स : 24
कारकिर्दीतील विजय/पराभव : 1163/233
लढतीची भारतीय प्रमाणवेळ : दुपारी 2 वाजता
थेट प्रक्षेपण :
सोनी स्पोर्टस् नेटवर्क
लाईव्ह स्ट्रीमिंग :
सोनी लिव्ह अॅप