Nikhil Chaudhary Australia T20 : ६२ वर्षांनंतर प्रथमच..! ऑस्ट्रेलियाच्या T20 संघात मिळाले भारतीय वंशाच्या क्रिकेटपटूला स्थान

Nikhil Chaudhary Australia T20 : अफगाणिस्तानविरुद्धच्या T20 मालिकेसाठी संघात निवड
Nikhil Chaudhary Australia T20
भारतीय वंशाच्या क्रिकेटपटू निखिल चौधरीला ट्रॅव्हिस हेडचा बदली खेळाडू म्हणून T20 संघात स्थान मिळाले आहे. Pudhari
Published on
Updated on

Nikhil Chaudhary Australia T20 : बांगलादेश दौऱ्यावर असलेल्या ऑस्ट्रेलियन संघात एक मोठा बदल करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाने दिल्लीत जन्मलेल्या निखिल चौधरीला (Nikhil Chaudhary ) ट्रॅव्हिस हेडचा बदली खेळाडू म्हणून T20 संघात स्थान दिले आहे. निखिल चौधरीला बांगलादेशविरुद्ध पदार्पण (डेब्यू) करण्याची संधी मिळाली, तर ६० पेक्षा जास्त वर्षांनंतर ऑस्ट्रेलियासाठी खेळणारा तो पहिला भारतीय वंशाचा खेळाडू ठरू शकतो. सध्या ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश दरम्यान ३ सामन्यांची वनडे मालिका खेळवली जात आहे. यानंतर, १७ जूनपासून ३ सामन्यांच्या T20 मालिकेला सुरुवात होणार आहे. ट्रॅव्हिस हेड वैयक्तिक कारणांमुळे रजेवर असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

६२ वर्षांनंतर प्रथमच..!

अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी अंतिम अकरा खेळाडूंच्या संघात निखिलची निवड झाली, तर १९६४ मधील लेग-स्पिनर रेक्स सेलर्सनंतर ऑस्ट्रेलियाकडून खेळणारा चौधरी हा भारतात जन्मलेला पहिलाच क्रिकेटपटू ठरणार आहे. लेग-स्पिनर रेक्स सेलर्स यांनी १९६४ ची कोलकाता कसोटी खेळली होती. त्यानंतर एकाही भारतीय वंशाच्या खेळाडूला ऑस्ट्रेलियाच्या मुख्य राष्ट्रीय संघात स्थान मिळालेले नाही.

Nikhil Chaudhary Australia T20
FIFA World Cup 2026 : नेमार-विनिशियसवर ब्राझीलच्या विश्वविजयाची मदार! जाणून घ्या संघाची ताकद आणि कमकुवत बाजू

निखिलचे कबड्डीपासून प्रेरित असणारे 'विकेट सेलिब्रेशन' चर्चेत

३० वर्षांचा चौधरी गेल्या तीन 'बीबीएल' (Big Bash League) सीझनमध्ये 'होबार्ट हरिकेन्स' संघाचा महत्त्वाचा सदस्य म्हणून समोर आला आहे. मैदानातील त्याची खास शैली आणि कबड्डीपासून प्रेरित असणारी त्याची 'विकेट सेलिब्रेशन'ची पद्धत चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस पडली आहे.

Nikhil Chaudhary Australia T20
Iraq FIFA World Cup 2026 | "चला, जगाला थक्क करूया.." : ४० वर्षांनंतर इराकची फिफा विश्वचषकात धडाकेबाज एन्ट्री

कोण आहे निखिल चौधरी?

निखिल चौधरी हा ऑस्ट्रेलियाचा नागरिक नसून तिथला कायमचा रहिवासी आहे. ऑस्ट्रेलियाकडून खेळण्यासाठी लागणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) पात्रता निकषांची त्याने पूर्तता केली आहे. दिल्लीत जन्मलेल्या निखिलने हरभजन सिंग, शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा यांसारख्या दिग्गजांसोबत पंजाबच्या राज्य संघासाठी १४ मर्यादित षटकांचे सामने खेळले आहेत. त्याने आयपीएल संघ मुंबई इंडियन्ससाठी ट्रायलही दिली होती. कोरोना महामारीच्या काळात जेव्हा आंतरराष्ट्रीय सीमा बंद झाल्या, तेव्हा तो क्वीन्सलंडमध्ये राहणाऱ्या आपल्या काकांना भेटायला गेला होता. यानंतर त्याला ऑस्ट्रेलियातच आपले क्रिकेटचे स्वप्न पुढे नेण्याची संधी मिळाली.

Nikhil Chaudhary Australia T20
Paki vs Ban| "आता काय ICC ट्रॉफी चोरणार का?" : बांगलादेशने लोळवल्‍यानंतर माजी क्रिकेटपटूने नक्‍वींसह पाकिस्तान संघाला झापले

पोस्टमन म्हणून केले काम

क्रिकेटमध्ये नाव कमवण्यापूर्वी निखिलला अनेक प्रकारच्या नोकऱ्या कराव्या लागल्या. एका मेक्सिकन रेस्टॉरंटमध्ये काम करत असताना त्याचे बोट कापले गेले होते, तर काही काळ त्याने पोस्टमन म्हणून पार्सल वितरणाचे कामही केले. माजी आंतरराष्ट्रीय ऑलराउंडर आणि नॉर्दर्न सबर्ब्स ग्रेडचे प्रशिक्षक जेम्स होप्स यांच्या शिफारसीवरून त्याला 'होबार्ट हरिकेन्स' संघात जागा मिळाली.

Nikhil Chaudhary Australia T20
Cricket Boycott History : १९९६ ते २०२६..! मैदान सोडून पळण्याची ही पहिली वेळ नाही, जाणून घ्या विश्वचषकातील ‘बहिष्कारा’चा इतिहास

होबार्टला BBL 14 चे विजेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा

होबार्टला BBL 14 चे विजेतेपद मिळवून देण्यात त्याने मोलाचा वाटा उचलला. गेल्या उन्हाळी हंगामात त्याने ३०.७० च्या सरासरीने आणि १५३ च्या स्ट्राईक रेटने ३०७ धावा केल्या, हा त्याचा फलंदाजीतील सर्वोत्तम सीझन ठरला. मात्र, संघात रेहान अहमद आणि रिषाद हुसेन या रिस्ट-स्पिनर्सचे आगमन झाल्यामुळे गोलंदाज म्हणून त्याची भूमिका थोडी कमी झाली. नुकतेच त्याने तस्मानियासोबत आपला पहिला स्टेट कॉन्ट्रॅक्ट (राज्य करार) साइन केला आहे. शेफिल्ड शील्ड सीझनमध्ये त्याने शानदार पदार्पण केले होते; ज्यामध्ये त्याने ऑक्टोबर महिन्यात क्वीन्सलंडविरुद्ध ५ विकेट्स घेतल्या आणि नोव्हेंबरमध्ये NSW विरुद्ध धडाकेबाज शतक झळकावले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news