Iraq FIFA World Cup 2026 | "चला, जगाला थक्क करूया.." : ४० वर्षांनंतर इराकची फिफा विश्वचषकात धडाकेबाज एन्ट्री

इराकचा संघ तीन दिवसांचा खडतर प्रवास करून पोहोचला होता मेक्सिकोला
Iraq FIFA World Cup 2026
बोलिव्हियावर २-१ विजय मिळवत. तब्बल ४० वर्षानंतर इराक संघ विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे.
Published on
Updated on

Iraq FIFA World Cup 2026 Qualification

मेक्सिको : एकीकडे मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे प्रचंड तणाव असतानाच जगभरातील फुटबॉल चाहत्यांसाठी आजचा (दि. १ एप्रिल) दिवस स्मरणीय ठरला आहे. मेक्सिकोमध्ये झालेल्या आंतरखंडीय प्ले-ऑफ सामन्यात इराकने बोलिव्हियावर २-१ असा अटीतटीचा विजय मिळवला. तब्बल ४० वर्षानंतर इराकचा संघ विश्वचषकासाठी पात्र ठरणारा ४८ वा आणि शेवटचा संघ ठरला आहे. या ऐतिहासिक विजयानंतर प्रशिक्षक ग्रॅहम अर्नोल्ड यांनी आपल्या खेळाडूंना, "चला, जगाला थक्क करून सोडूया.." असे आवाहन केले आहे.

आता इराकचा संघ Group I मध्ये

मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे इराकच्या फुटबॉल संघाला विश्वचषक पात्रता सामन्यांच्या तयारीमध्ये अनेक अडथळे आले. मात्र या सर्व अडथळ्यांवर मात करत ४० वर्षांनंतर प्रथमच या देशाने विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता इराकचा संघ गट 'आय' (Group I) मध्ये फ्रान्स, सेनेगाल आणि नॉर्वे विरुद्ध खेळणार आहे. बोलिव्हिया विरुद्धच्या सामन्यात अली अल-हामदी आणि आयमेन हुसेन यांनी केलेल्या गोलमुळे इराकने हा विजय साकारला. यापूर्वी इराक १९८६ मध्ये मेक्सिको येथे झालेल्या विश्वचषकात खेळला होता.

Iraq FIFA World Cup 2026
FIFA World Cup 2026: फिफा वर्ल्डकपमध्येही 'पाकिस्तानी' रणनिती... बहिष्कार, धमकी अन् सामना हलवण्याची मागणी

"खेळाडूंसाठी हे खूप कठीण होते...." : प्रशिक्षक ग्रॅहम अर्नोल्ड

मध्यपूर्वेतील सध्याची परिस्थिती पाहता खेळाडूंसाठी हे खूप कठीण होते. मला खेळाडूंचा अभिमान आहे. सर्व मुलं खूप कष्टाळू आहेत. ४.६ कोटी इराकी लोकांसाठी आज मी अत्यंत आनंदी आहे. मला आशा आहे की यामुळे इराक आणि तेथील फुटबॉलकडे बघण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलेल, असा विश्वास इराकचे ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक अर्नोल्ड यांनी व्यक्त केला. विश्वचषकात आम्ही असे काहीतरी करू जे कोणालाही अपेक्षित नसेल. चला, जगाला थक्क करून सोडूया." असे आवाहनही त्यांनी फुटबॉलपटूंना केले आहे.

Iraq FIFA World Cup 2026
T20 World Cup 2026: भारताकडून हरलात ५० लाख रूपये द्या... पीसीबी पाकिस्तान संघाकडून वसूल करणार दंड

अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्धामुळे अनेक अडथळे

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे इराकच्या फुटबॉल संघासमोर मोठे अडथळे निर्माण झाले होते. इराकचा संघ बगदादहून जॉर्डनला रस्तेमार्गे गेल्यानंतर तीन दिवसांचा खडतर प्रवास करून मेक्सिकोला पोहोचला होता. मात्र, या थकव्याचा खेळावर कोणताही परिणाम दिसला नाही. बोलिव्हिया विरुद्धच्या सामन्यात इराकने सुरुवातीला वर्चस्व राखले होते, परंतु ३८ व्या मिनिटाला बोलिव्हियाच्या मोइसेस पनियाग्वा याने गोल करत सामना १-१ अशा बरोबरीवर आणला. या गोलमुळे इराकचा संघ काही काळ दबावाखाली आला होता. मात्र, मध्यंतरानंतर आठ मिनिटांनी इराकने पुन्हा आघाडी घेत फुटबॉल विश्वचषकासाठी पात्र ठरणारा ४८ वा आणि शेवटचा संघ ठरला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news