

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राचे जगभरात अनेक चाहते आहेत. ब्रुसेल्स, बेल्जियम येथे झालेल्या डायमंड लीगच्या फायनलमध्ये तो सहभागी झाला होता. या स्पर्धेत नीरजचे विजेतेपद एका सेंटीमीटरच्या फरकाने हुकले असले तरी, त्याची फॅन फॉलोइंग कमी झालेली नाही. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये दोन महिला चाहत्यांनी त्याच्यासोबत फोटो काढण्याची मागणी करताना दिसत आहेत. यानंतर त्यांनी नीरजकडे फोन नंबरची मागणी केली. यावर नीरजने नम्रपणे उत्तर देत या मागणीला नकार दिला.
भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने ब्रुसेल्स येथे झालेल्या डायमंड लीगच्या अंतिम फेरीत दुसरे स्थान पटकावले. यानंतर नीरजने एका पोस्टद्वारे सांगितले होते की, त्याच्या हाताला फ्रॅक्चर झाले असूनही तो खेळायला आला आणि दुसऱ्या क्रमांकावर राहिला. या पोस्टमध्ये नीरजने असेही सांगितले होते की त्याचा सीझन संपला आहे आणि आता तो पुढच्या सीझनमध्ये आणखी मजबूत पुनरागमन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या पोस्टवर चाहत्यांकडून अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. तसेच नीरज लवकर बरा होण्यासाठी अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणाऱ्या नेमबाज मनू भाकरचाही या पोस्टवर नीरजसाठी शुभेच्छा दिल्या.
यावर पोस्टवर मनूने नीरजचे अभिनंदन केले आणि त्याला दुखापतीतून लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी ती म्हणाली की, एका शानदार हंगामासाठी अभिनंदन. मी तुम्हाला जलद बरे होण्यासाठी आणि पुढील वर्षांमध्ये अधिक यशासाठी शुभेच्छा देतो. नीरज आपल्या पोस्टमध्ये म्हणाला की, 2024 चा हंगाम संपत असताना, मी वर्षभरात शिकलेल्या सर्व गोष्टींचा विचार करत आहे. ज्यात सुधारणा, अडथळे, मानसिकता आणि बरेच काही आहे. सोमवारी सराव करताना मला दुखापत झाली. यावेळी एक्स -रेमध्ये उघड झाले की, माझ्या डाव्या हाताच्या चौथ्या मेटाकार्पल हाडात फ्रॅक्चर झाले आहे, पण माझ्या टीमच्या मदतीने मी स्पर्धेत उतरू शकलो. ही वर्षातील शेवटची स्पर्धा होती. स्पर्धेत मी माझ्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही.