Lebanon Pager Blast
लेबनॉन मंगळवारी कम्युनिकेशन पेजरच्या स्फोटाने हादरले. (Image source-X)

'इस्रायल'च्या Mossad चे खतरनाक प्लॅनिंग! हजारो पेजर्समधून कसे घडवले स्फोट?

Lebanon Pager Blast | काय आहे PETN? जे वापरून 'हिजबुल्लाह'ला केले टार्गेट
Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क

सीरीया आणि लेबनॉन मंगळवारी कम्युनिकेशन पेजरच्या स्फोटाने हादरले. या स्फोटात दहशतवादी गट हिजबुल्लाहच्या (Hezbollah) सदस्यांसह ९ लोक ठार झाले. तर किमान २,८०० लोक जखमी झाले. मृतांमध्ये ८ वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. या हल्ल्यामागे इस्रायलचा (Israel) हात होता, असे वृत्त सीएनएनने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

हिजबुल्लाहने या हल्ल्याचा बदला घेणार असल्याचा इशारा इस्रायलला दिला आहे. यामुळे मध्य पूर्वेत संघर्ष आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. लेबनीज सरकारने या हल्ल्याचा “गुन्हेगारी इस्रायली कृत्य” अशा शब्दांत निषेध नोंदवला आहे.

दरम्यान, इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादने (Mossad) मंगळवारी झालेल्या स्फोटाच्या पाच महिने आधीच लेबनॉनचा दहशतवादी गट हिजबुल्लाहने ऑर्डर केलेल्या ५ हजार तैवान निर्मित पेजरमध्ये थोड्या प्रमाणात स्फोटके पेरली होती, असा दावा अनेक रिपोर्ट्समध्ये वरिष्ठ लेबनीज सुरक्षा सुत्रांच्या हवाला देत करण्यात आला आहे.

पेजर्स, वायरलेस कम्युनिकेशन डिव्हाइसेसचा एकाचवेळी स्फोट

इराण समर्थक दहशतवादी गट हिजबुल्लाहचे हजारो सदस्य वापरत असलेले पेजर्स, वायरलेस कम्युनिकेशन डिव्हाइसेसचा मंगळवारी लेबनॉन आणि सीरियाच्या काही भागांमध्ये एकाच वेळी स्फोट झाला. यात किमान ९ लोक ठार झाले आणि शेकडो जखमी झाले. सीरियामध्ये जवळपास १०० स्फोट झाले आहेत.

पेजर्सना कोडेड मेसेज पाठवल्यानंतर स्फोट

पेजर्सना कोडेड मेसेज आल्यानंतर स्फोट झाला, असा आरोप लेबनीज सुरक्षा सुत्रांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेशी बोलताना केला आहे. "मोसादने डिव्हाइसमध्ये एक बोर्ड बसविला; ज्यामध्ये स्फोटक सामग्री असून त्याला एक कोड प्राप्त होतो. ते शोधणे खूप कठीण आहे. कोणत्याही डिव्हाइस किंवा स्कॅनरदेखील ते शोधता येत नाही," असे वृत्त रॉयटर्सने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

गोल्ड अपोलोकडून किती पेजर्स मागवले?

हिजबुल्लाहने तैवान (Taiwan) येथील गोल्ड अपोलो या कंपनीकडून ५ हजार पेजर्स मागवले होते. एप्रिल ते मे दरम्यान त्याची देशात तस्करी करण्यात आली होती. AP924 व्हेरिएंट असे स्फोट झालेल्या पेजरचे मॉडेल आहे. स्फोटाने नुकसान झालेल्या पेजर काही फोटो समोर आले आहेत. त्यात मागील बाजूस गोल्ड अपोलोने तयार केलेल्या पेजर सारखे स्टिकर्स आणि डिझाइनदेखील दिसून आले आहे.

पेजर्सवर एक मेसेज आला अन्...

स्काय न्यूज अरेबियाने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, इस्रायली गुप्तचर संस्था मोसादने डिव्हायसेसच्या बॅटरीवर PETN ही अत्यंत स्फोटक वस्तू ठेवली होती. परिणामी बॅटरीचे तापमान वाढल्याने त्यांचा स्फोट झाला. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पेजरचा मॉडेल क्रमांक AP924 असा होता. प्रत्येक पेजरमध्ये बॅटरीजवळ एक ते दोन स्फोटक जोडली होती. लेबनॉनमध्ये दुपारी साडेतीन वाजता या पेजर्सवर एक मेसेज आला. त्यानंतर पेजरमध्ये बसवलेली स्फोटक सक्रिय झाली, असे सूत्रांचे म्हणणे आहे. पेजरमधील स्फोटापूर्वी त्यात काही सेकंदांपर्यंत बीपचा आवाज आला आणि त्याचा स्फोट झाला, असे सांगण्यात आले आहे.

Lebanon Pager Blast
Lebanon Pager Explosion : लेबनॉन हादरलं! पेजर बॉम्बस्फोटात ८ ठार, २,७५० जखमी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news