पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी चिंता वाढवणारी बातमी ; भालाफेकपटू नीरज चोप्रा जखमी

Lausanne Diamond League
Lausanne Diamond League
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारताच्या स्टार भालाफेकपटूने दुखापतीमुळे ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक ऍथलेटिक्स मीटमधून माघार घेतली आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताची सर्वोच्च पदकाची आशा असलेला नीरज चोप्रा स्पर्धेच्या काही महिन्यांपूर्वीच दुखापतग्रस्त झाल्‍याने भारताची चिंता वाढली आहे.

अलीकडेच भारतातील फेडरेशन चषक स्पर्धेत भाग घेतलेल्या चोप्रा यांना स्नायूंना दुखापत झाली आहे. त्‍यामुळे त्‍याला झेक प्रजासत्ताकमधील स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. नीरज चोप्रा 28 मे मध्ये ऑस्ट्रावाच्या गोल्डन स्पाइक स्‍पर्धेत भाग घेईल, अशी अपेक्षा होती. दोन आठवड्यांपूर्वी सराव करताना झालेल्या दुखापतीमुळे तो ऑस्ट्रावामध्ये भालाफेकीस उतरणार नाही. मात्र ताे या स्‍पर्धेच्‍या कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्‍हणून सहभागी होणार असल्‍याचे निवेदनात नमूद करण्‍यात आले आहे.

नीरज चोप्राने १५ मे राेजी भुवनेश्वरमध्ये झालेल्‍या पुरुषांच्या भालाफेकीच्या अंतिम फेरीत ८२.२७ मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नाने सुवर्णपदक जिंकले हाेते. मागील वर्षी मे महिन्यात, नीरजला प्रशिक्षणादरम्यान दुखापत झाली होती. यानंतर त्याने हेन्जेलो येथील एफबीके गेम्समधून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news