Cricket Semifinal Match : 14 नो बॉल.. 7 विकेट..! मुकेश कुमारचे चेंडूवरचे नियंत्रण सुटले, पण भेदकता कायम

दलीप ट्रॉफी उपांत्य फेरी : ईस्ट झोनला विजयासाठी १५९ धावांचे आव्हान
Cricket Semifinal Match : 14 नो बॉल.. 7 विकेट..! मुकेश कुमारचे चेंडूवरचे नियंत्रण सुटले, पण भेदकता कायम
Published on
Updated on

बेंगळुरू : दुलीप ट्रॉफी २०२६ चा पहिला उपांत्य फेरीचा सामना सध्या ईस्ट झोन आणि सेंट्रल झोन यांच्यात रंगला आहे. या सामन्यात ईस्ट झोनच्या संघाने प्रभावी कामगिरी बजावली आहे. गोलंदाजांपासून ते फलंदाजांपर्यंत प्रत्येकानेच संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. ईस्ट झोनकडून खेळताना वेगवान गोलंदाज मुकेश कुमार सर्वाधिक यशस्वी ठरला. त्याने दोन्ही डावांत मिळून एकूण ७ गडी बाद केले. मात्र, या दरम्यान त्याने वारंवार टाकलेल्या 'नो बॉल'मुळे कर्णधार काहीसा नाराज दिसला.

मुकेश कुमारकडून दोन्ही डावांत तब्बल १४ 'नो बॉल'

मुकेश कुमारच्या गोलंदाजीचा विचार केल्यास, त्याने पहिल्या डावात १६ षटके गोलंदाजी करत ५६ धावांच्या मोबदल्यात ३ फलंदाजांना बाद केले. मात्र, या स्पेलदरम्यान त्याने ६ नो बॉल आणि एक वाईड चेंडू टाकला. दुसऱ्या डावातही हीच परिस्थिती पाहायला मिळाली. दुसऱ्या डावातील १२ षटकांच्या गोलंदाजीत त्याने ४४ धावा देत ४ बळी टिपले; परंतु या डावात त्याने ८ नो बॉल आणि दोन वाईड चेंडू टाकले. अशा प्रकारे एकाच सामन्यात त्याने एकूण १४ नो बॉल टाकले, जे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सहसा पाहायला मिळत नाही. दिलासादायक बाब म्हणजे, या चुकांनंतरही त्याने सामन्यात एकूण ७ महत्त्वपूर्ण गडी बाद केले.

Cricket Semifinal Match : 14 नो बॉल.. 7 विकेट..! मुकेश कुमारचे चेंडूवरचे नियंत्रण सुटले, पण भेदकता कायम
Lionel Messi Records : असा ‘मेस्सी’ पुन्हा होणे नाही! अर्जेंटिनाच्या महानायकाच्या कारकिर्दीला आकार देणारे १० अविस्मरणीय क्षण

पहिल्या डावात दोन्ही संघांची २६६ धावांची बरोबरी

सामन्याच्या पहिल्या डावात सेंट्रल झोनने प्रथम फलंदाजी करताना २६६ धावा उभारल्या होत्या. त्यांच्याकडून रिंकू सिंगने एकमेव अर्धशतक झळकावले, तर आर्यन जुयालने ४६ धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात ईस्ट झोननेही वैभव सूर्यवंशी आणि अभिमन्यू ईश्वरन यांच्या अर्धशतकांच्या जोरावर पहिल्या डावात २६६ धावा करत बरोबरी साधली. या दरम्यान वैभवने दुलीप ट्रॉफीच्या इतिहासात अर्धशतक झळकावणारा सर्वात तरुण फलंदाज ठरण्याचा ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला.

Cricket Semifinal Match : 14 नो बॉल.. 7 विकेट..! मुकेश कुमारचे चेंडूवरचे नियंत्रण सुटले, पण भेदकता कायम
Messi Magic... पदार्पणाच्या ४७ सेकंदांत रेड कार्ड ते विश्वविजेतेपदाचे सर्वोच्च शिखर

ईस्ट झोनला विजयासाठी १५९ धावांचे आव्हान

दुसऱ्या डावात सेंट्रल झोनचा संपूर्ण संघ ५०.२ षटकांत अवघ्या १५८ धावांवर गारद झाला. त्यामुळे ईस्ट झोनला अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी आता १५९ धावांचे लक्ष्य पार करावे लागणार आहे. सेंट्रल झोनच्या एकाही फलंदाजाला दुसऱ्या डावात अर्धशतक गाठता आले नाही. अमन मोखडेने सर्वाधिक ४० धावा (८९ चेंडू) केल्या. याशिवाय अर्शद खानने २५ आणि हर्ष दुबेने २४ धावांचे योगदान दिले.

Cricket Semifinal Match : 14 नो बॉल.. 7 विकेट..! मुकेश कुमारचे चेंडूवरचे नियंत्रण सुटले, पण भेदकता कायम
Lionel Messi Retirement: मेस्सीची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर! अर्जेंटिनासोबतचा २१ वर्षांचा भावूक प्रवास संपुष्टात

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news