MS Dhoni IPL 2026 | धोनी IPL 2026 खेळणार; पण CSKच्या सीईओंनी दिली महत्त्वाची अपडेट

MS Dhoni IPL 2026 | यंदाचा हंगाम २८ मार्च रोजी सुरू होण्याची शक्यता
MS Dhoni IPL 2026.
एमएस धोनी Pudhari Photo.
Published on
Updated on
Summary

सीएसकेने राजस्थान रॉयल्सकडून संजू सॅमसनची खरेदी केली. यानंतर यंदाच्या आयपीएलमध्ये एम. एस. धोनी खेळणार का, याबाबत चर्चा सुरू झाली होती.

MS Dhoni IPL 2026

चेन्‍नई : एमएस धोनी आगामी हंगामात संपूर्ण खेळेल, असे चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ कासी विश्वनाथन यांनी आज (दि. ११ मार्च) स्पष्ट केले. मात्र कोचिंग स्टाफ त्याच्या भूमिकेबद्दल निर्णय घेईल, अशी माहिती चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) कासी विश्वनाथन यांनी आज (११ मार्च) दिली.

"तो सर्व सामने खेळेल"

"तो सर्व सामने खेळेल," कासी विश्वनाथन चेन्नईमध्ये माध्यमांशी बोलताना सांगितले. मी सांगू शकत नाही की, यंदाच्या हंगामात तो फलंदाज म्हणून खेळणार आहे की, यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून की इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळणार आहे. हे संघ व्यवस्थापकच ठरवतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, धोनीला मागील काही काळात गुडघ्याच्या दुखापतीला तोंड द्यावे लागले असले तरी, गेल्या दोन हंगामात तो खेळला आहे. आयपीएल २०२५ मध्ये रुतुराज गायकवाडला दुखापत झाल्यानंतर धोनीने स्पर्धेच्या मध्यभागी कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली होती.

MS Dhoni IPL 2026.
Mumbai Indians New Jersey : ‘परंपरेचा मान आणि विजयाची शान!’.. IPL 2026 साठी MI ची नवी जर्सी लॉंच

चेन्नई संघ पुनरागमनासाठी सज्ज

आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी खालावली होती. मात्र पाच वेळा विजेतेपद मिळवणारा हा संघ आगामी हंगामात जोरदार पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे.

MS Dhoni IPL 2026.
IPL 2026 साठी राजस्थान रॉयल्सकडून नव्या कर्णधाराची घोषणा! जडेजा-जैस्वाल पडले मागे, २४ वर्षीय खेळाडूकडे सोपवले नेतृत्व

संजू आणि शिवमच्या कामगिरीमुळे संघाचा आत्मविश्वास वाढला

कासी विश्वनाथन यांनी भारताने सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकल्याचा आनंद व्यक्त केला. विशेषतः संजू सॅमसन आणि शिवम दुबे या सीएसकेच्या खेळाडूंनी विश्वचषकात केलेल्या चमकदार कामगिरीमुळे संघाचा आत्मविश्वास वाढला असल्याचे त्यांनी सांगितले. विश्वचषकातील या यशामुळे आगामी आयपीएलमध्ये चेन्नईचा संघ अधिक जोमाने मैदानात उतरेल, असा विश्वास विश्वनाथन यांनी व्यक्त केला आहे.

MS Dhoni IPL 2026.
IPL 2026 : KKRने मुस्तफिजूरला 9.20 कोटी द्यावे लागतील का? नियम काय सांगतो

चेन्नईत होणार सर्व सामने?

सीएसके त्यांचे सर्व सामने चेन्नईमध्ये खेळेल. आम्हाला फक्त तामिळनाडूमध्ये खेळायचे आहे. बीसीसीआयकडून वेळापत्रक जाहीर होण्याची आम्ही वाट पाहत आहोत. सॅमसनच्या आगमनानंतरही सीएसके ऋतुराजच्या नेतृत्वाखाली हंगामाची सुरुवात करेल. धोनी संघातील सर्वात प्रभावशाली खेळाडूंपैकी एक असेल, असेही विश्वनाथन यांनी स्पष्ट केले.

MS Dhoni IPL 2026.
IPL 2026: पंजाब किंग्स म्हणजे सोन्याची खाण! IPL मधून प्रीती झिंटाची किती कमाई होते? जाणून घ्या किती आहे संपत्ती

धोनीने चेन्नईत केला सराव

सीएसकेने राजस्थान रॉयल्सकडून संजू सॅमसनची खरेदी केली. यानंतर यंदाच्या आयपीएलमध्ये एम. एस. धोनी खेळणार का, याबाबत चर्चा सुरू झाली होती. धोनी मार्चच्या पहिल्या आठवड्यात चेन्नईला आला. येथे इतर सहकाऱ्यांसोबत त्याने सरावही केला. ४४ वर्षीय धोनी सराववेळी तंदुरुस्त दिसत होता. आता आयपीएलच्या दोन महिन्यांच्या हंगामासाठी सज्ज असल्याचे संकेतच त्याने दिले. विशेष म्हणजे, धोनीने गेल्या महिन्यात रांचीमध्ये हलक्या नेट सेशनसह आगामी हंगामाची तयारी सुरू केली होती.

MS Dhoni IPL 2026.
IPL Auction 2026 Prithvi Shaw: अनसोल्ड पृथ्वीची तुटलेल्या ह्रदयाची पोस्ट... क्षणातच का केली डिलीट?

IPL 2026 साठी CSK पूर्ण संघ

एमएस धोनी, रुतुराज गायकवाड, संजू सॅमसन, आयुष म्हात्रे, डेवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, उर्विल पटेल, नूर अहमद, नॅथन एलिस, श्रेयस गोपाल, खलील अहमद, रामकृष्ण घोष, मुकेश, ओव्हरटेन गुरजे, जम्बोज, जैमबोलज, अनंत चौधरी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news