पुढारी वृत्तसेवा
शाहरूख खानच्या मालकीच्या KKR ने गेल्या महिन्यात अबुधाबी येथे झालेल्या लिलावात मुस्तफिजूरला 9.20 कोटी रुपयांना विकत घेतले होते.
मात्र, बीसीसीआयच्या निर्देशानंतर त्याला करारातून मुक्त करण्यात आले.
या नाट्यमय घडामोडीनंतर मुस्तफिजूरला केकेआरने ही रक्कम द्यावी लागेल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर नियमावलीवर एक दृष्टिक्षेप...
लिलावात करारबद्ध झाल्यानंतर एखादा खेळाडू स्वत: IPLमधून माघार घेत असेल किंवा एकही सामना खेळणार नसेल तर त्याला फ्रँचायझीने मानधन देण्याची आवश्यकता असत नाही.
एखाद्या खेळाडूला दुखापत झाल्याने तो एकही सामना न खेळता स्पर्धेतून बाहेर गेला तर अशा परिस्थितीत त्यालाही मानधन द्यावे लागत नाही.
याचवेळी फ्रँचायझीने करारबद्ध करूनही एखाद्या खेळाडूला एकाही सामन्यात खेळवले नाही तरी त्याला पूर्ण मानधन द्यावे लागते.
मुस्तफिजूरबाबत विचार करता, केकेआर फ्रँचायझीने त्याला स्वत:हून करारमुक्त केले असल्याने त्यांनी कराराची पूर्ण रक्कम त्याला अदा करणे भाग असणार आहे.
मात्र, उभयतांनी यात परस्पर सहमतीने तडजोड केली तर त्यात केकेआरने पूर्ण रक्कम न देता थोडीफार नुकसानभरपाई करून हा मुद्दा निकालात काढता येऊ शकतो.