IPL 2026: पंजाब किंग्स म्हणजे सोन्याची खाण! IPL मधून प्रीती झिंटाची किती कमाई होते? जाणून घ्या किती आहे संपत्ती

Preity Zinta’s Net Worth: प्रीती झिंटा ही केवळ अभिनेत्री नाही, तर आयपीएलमधील पंजाब किंग्स संघाची सहमालक आहे. 2008 मध्ये तिने केलेली 35 कोटींची गुंतवणूक आज सुमारे 350 कोटींवर पोहोचली आहे.
Preity Zinta’s Net Worth
Preity Zinta’s Net WorthPudhari
Published on
Updated on

Preity Zinta IPL Net Worth: बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा ही अभिनयाबरोबरच क्रिडा क्षेत्रातही सक्रिय आहे. आयपीएलमधील पंजाब किंग्स या संघाची ती सहमालक आहे. आयपीएल 2025 मध्ये पंजाब किंग्सने थेट अंतिम फेरी गाठली होती. या स्पर्धेमुळे प्रीती झिंटाला मोठा आर्थिक फायदा झाला.

आयपीएलमधून प्रीती झिंटाची कमाई अनेक मार्गांनी होते. तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नातील मोठा वाटा संघमालकांना मिळतो. साधारणपणे तिकीट विक्रीच्या उत्पन्नातील सुमारे 80 टक्के हिस्सा संघमालकांच्या वाट्याला येतो. याशिवाय संघाच्या स्पॉन्सरशिपमधूनही मोठी कमाई होते.

प्रीती झिंटा 2008 साली पंजाब किंग्सची सहमालक बनली होती. त्यावेळी हा संघ सुमारे 76 मिलियन डॉलरला विकत घेण्यात आला होता. पुढील काही वर्षांत आयपीएलची लोकप्रियता आणि व्यावसायिक मूल्य झपाट्याने वाढले. 2022 पर्यंत या संघाची किंमत सुमारे 925 मिलियन डॉलरपर्यंत पोहोचली. 2008 मध्ये प्रीती झिंटाने या संघात अंदाजे 35 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. मनीकंट्रोलच्या अहवालानुसार आज या गुंतवणुकीचे मूल्य सुमारे 350 कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे.

Preity Zinta’s Net Worth
Fact Check: लग्नाच्या फक्त दोन तास आधी वधू तिच्या प्रियकराला भेटत असल्याचा व्हिडिओ व्हायरल; जाणून घ्या काय आहे सत्य

प्रीती झिंटाची एकूण संपत्तीही वाढली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार तिची नेटवर्थ सुमारे 183 कोटी रुपये आहे. अभिनय, ब्रँड एंडोर्समेंट आणि विविध व्यावसायिक गुंतवणुकीतून तिला चांगले उत्पन्न मिळते. एका ब्रँड एंडोर्समेंटसाठी ती सुमारे दीड कोटी रुपये मानधन घेते, अशीही चर्चा आहे.

रिअल इस्टेटमध्ये प्रीती झिंटा आघाडीवर आहे. मुंबईत तिचे सुमारे 17 कोटी रुपये किमतीचे घर आहे. शिमल्यातही तिचे एक आलिशान घर असून त्याची किंमत सुमारे 7 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. याशिवाय अमेरिकेतील बेव्हरली हिल्समध्येही तिचा बंगला आहे.

Preity Zinta’s Net Worth
SHANTI Bill Explained: शांती विधेयक काय आहे? भारताच्या अणुऊर्जा क्षेत्रात काय बदल होणार?

प्रीती झिंटाने जीन गुडइनफ यांच्याशी विवाह केला असून ती पतीसह लॉस एंजेलसमध्ये राहते. ती दोन मुलांची आई आहे. प्रीती झिंटा लवकरच ‘लाहोर 1947’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटात ती सनी देओल सोबत चित्रपटात दिसणार असून चित्रपटाची निर्मिती आमिर खान करत आहे, तर दिग्दर्शनाची धुरा राजकुमार संतोषी यांच्याकडे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news