MS Dhoni: भारताच्या विजयानंतर धोनीची गौतम गंभीरसाठी खास पोस्ट; बुमराहचंही केलं कौतुक

India vs New Zealand T20 World Cup 2026 final: आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ९६ धावांनी दणदणीत विजय मिळवत तिसऱ्यांदा विश्वविजेतेपदावर नाव कोरले.
MS Dhoni
MS Dhonifile photo
Published on
Updated on

अहमदाबाद: आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ९६ धावांनी दणदणीत विजय मिळवत तिसऱ्यांदा विश्वविजेतेपदावर नाव कोरले. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रचल्या गेलेल्या या इतिहासानंतर मैदानावर जल्लोष सुरू असतानाच, सोशल मीडियावेर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

MS Dhoni
Team India World Champion : विश्वविजेतेपदाचा 'अश्वमेध'! भारताचा ऐतिहासिक पराक्रम; किवींचे पानिपत करत रचला सुवर्ण इतिहास

धोनीने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचे खास शैलीत कौतुक केले आहे. अंतिम सामन्यादरम्यान धोनी व्हीव्हीआयपी बॉक्समध्ये रोहित शर्मा आणि जय शाह यांच्यासोबत बसलेला दिसला होता. भारताच्या विजयानंतर धोनीने इन्स्टाग्रामवर टीम इंडियाचे अभिनंदन करताना गंभीर यांचा उल्लेख करत लिहिले की, "कोच साहेब, तुमच्या चेहऱ्यावर हे हसू खूपच छान दिसतंय!"

गौतम गंभीर हे त्यांच्या शिस्तप्रिय आणि गंभीर स्वभावासाठी ओळखले जातात. मात्र, विश्वचषक जिंकल्यानंतरचा त्यांचा आनंद पाहून धोनीने केलेली ही टिप्पणी चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. धोनी आणि गंभीर यांच्यात मतभेद असल्याच्या अफवांना या पोस्टने पूर्णविराम दिला आहे.

बुमराहचे केले खास कौतुक

धोनीने त्याच्या पोस्टमध्ये भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचेही कौतुक केले. त्याने ते त्याच्याच शैलीत विनोदी पद्धतीने लिहिले. धोनीने लिहिले, "बुमराहबद्दल मी काहीही न लिहिल्यास बरे होईल, चॅम्पियन गोलंदाज." बुमराहने अंतिम सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी केली, १५ धावांत ४ बळी घेतले आणि न्यूझीलंडच्या फलंदाजीची फळी उध्वस्त केली.

MS Dhoni
India Vs West Indies|भारताच्या विजयावर पाकिस्‍तानच्‍या माजी क्रिकेटपटूचा जळफळाट; हेटमायरच्या विकेटवरून केलं अजब विधान

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news