MS Dhoni Return IPL 2026: चेन्नईचा थला धोनी परतणार... पुनरागमनासाठी वानखेडेच्या रणभूमीची निवड, कोणाला बसावं लागणार संघाबाहेर?

MS Dhoni Return IPL 2026
MS Dhoni Return IPL 2026pudhari
Published on
Updated on

MS Dhoni Return IPL 2026: चेन्नई सुपर किंग्जचा स्टार क्रिकेट आणि ब्रेन एमएस धोनी यंदाच्या आयपीएल हंगामात दुखापतीमुळे खेळत नाहीये. धोनीला पहिल्या पाच सामन्यात खेळता आलेलं नाही. अजून एका सामन्यानंतर तो पूर्णपणे फिट होण्याची शक्यता आहे. त्यामुळं लीग स्टेजच्या मध्यावर पोहचलेल्या चेन्नई सुपर किंग्जसाठी हा मोठा बुस्टर डोस मिळण्याची शक्यता आहे.

महेंद्रसिंह धोनी हा पायाचा स्नायू दुखावल्यामुळं यंदाच्या आयपीएलमध्ये पहिले पाच सामने खेळू शकलेला नाही. मात्र तो मुंबई इंडियन्सविरूद्धच्या सामन्यापूर्वी पूर्णपणे फिट होण्याची शक्यता आहे. हा सामना २३ एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

MS Dhoni Return IPL 2026
MS Dhoni Video: ‘धोनी नीट चालू शकत नाही?’ IPL आधी व्हिडिओ व्हायरल; फिटनेसवर प्रश्नचिन्ह, चाहते चिंतेत

महेंद्रसिंह धनीने गेल्या वर्षीच आयपीएल २०२६ ची तयारी सुरू केली होती. मात्र सीएसकेच्या हंगामापूर्वीच्या सराव सत्रावेळी धोनीला दुखापत झाली होती. त्यामुळं ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणाऱ्या सीएसकेला पहिल्या पाच सामन्यात धोनीशिवायच खेळावं लागलं. स्मार्टेस्ट क्रिकेटिंग माईंड मैदानावर नसल्यानं सीएसकेला फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नाही. मात्र आता सीएसके बाऊन्स बॅक करण्याची शक्यता आहे कारण त्यांचा थला आता पूर्णपणे फिट होत आहे.

MS Dhoni Return IPL 2026
MS Dhoni: "मी ६० वर्षांपर्यंत खेळू शकतो!"; निवृत्तीच्या प्रश्नावर धोनीने स्वत:च सांगितलं; पाहा Video

धोनी जवळपास फिट

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार महेंद्रसिंह धोनी हा जवळपास फिट झाला आहे. तो यंदाच्या हंगामातील आपला पहिला सामना हा २३ एप्रिल रोजी खेळण्याची शक्यता आहे. धोनी संघासाोबत राजीव गांधी स्टेडियममध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. तिथं १८ एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्ज सनराईजर्स हैदराबादविरूद्ध सामना खेळणार आहे.

दुखापतीतून सावरताना धोनीने संघासोबत प्रवास करणं टाळलं होतं. एवढंच काय तर तो चेन्नईचे होम ग्राऊंड चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या सीएसकेच्या सामन्यावेळी देखील उपस्थित नव्हता. तो सातत्याने ट्रेनिंग करत होता. तो खूप काळ नेट्समध्ये फलंदाजी करत होता. त्याने नुकतेच सीएसके बॅटिंग कोच माईक हसीसोबत देखील सराव केला होता. मात्र त्याने कोणत्याही प्रमुख गोलंदाजाचा सामना केला नव्हता.

MS Dhoni Return IPL 2026
Dwayne Bravo Video: 'घरी दोन मुली होत्या...' पत्रकार परिषदेत ड्वेन ब्राव्होची जीभ घसरली, KKRच्या गोटात खळबळ

धोनी आल्यावर कोणाचा पत्ता होणार कट?

धोनी सराव करताना कोणतीही अडचण येत नव्हती. मात्र सध्याच्या घडीला तरी त्याने फक्त थ्रो डाऊन्स सोबतच सराव केला आहे. तसेच धोनी मैदानावर उतरण्यापूर्वी फिटनेस चाचणी देखील घेतली जाण्याची शक्यता आहे. मात्र धोनी संघात आल्यावर ऋतुराजलाच डोकेदुखी होणार आहे. धोनी आल्यावर कोणाला बाहेर काढायच हा कटू निर्णय त्याला घ्यावा लागणार आहे.

चेन्नईची गोलंदाजी हा कच्चा दुवा आहे. त्यामुळं ते गोलंदाजांमधून कोणालाही वगळण्याची शक्यता नाही. आतापर्यंत सीएसकेच्या फलंदाजांनीच चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळं फलंदाजांपैकी सर्फराज खानलाच प्लेईंग ११ मधील आपल्या जागेचा त्याग करावा लागण्याची शक्यता आहे. तसेही त्याचे संघातील स्थान डेवाल्ड ब्रेविस किंवा शिवम दुबे सारखे निश्चित नाही. तसेच सीएसके आयुष म्हात्रेला वगळण्याचा धोका घेणार नाही.

MS Dhoni Return IPL 2026
Sanju Samson Video: ‘उडा देंगे सर’… वैभव सूर्यवंशीचं धाडस; संजू सॅमसनने सांगितला IPL डेब्यूचा किस्सा

धोनीचा मदतीचा हात

जरी धोनी प्रसिद्धी झोताच्या बाहेर असला तरी तो संघाला मदत करत होती. ज्यावेळी सीएसकेने कोलकाता नाईट रायडर्सला १४ एप्रिल रोजी पराभूत केलं त्यावेळी बॉलिंग कोच श्रीधरन श्रीराम यांनी सांगितलं की नूर अहमदनं सामन्यापूर्वी धोनीसोबत वेळ घालवला होता. धोनीने त्याला काही कानमंत्र दिले होते. त्याने केकेआरविरूद्ध ३ विकेट्स घेत सामनावीराचा पुरस्कर पटकावला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news