MS Dhoni Fined: वाहतूक विभागाचा महेंद्रसिंग धोनीला दणका; ठोठावला 1,000 रुपयांचा दंड, काय आहे कारण?

MS Dhoni Fined for Overspeeding in Ranchi: रांचीमध्ये वाहनाची वेगमर्यादा ओलांडल्यामुळे माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीला 1,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
MS Dhoni Fined Overspeeding Ranchi
MS Dhoni Fined Overspeeding RanchiPudhari
Published on
Updated on

MS Dhoni Fined Overspeeding Ranchi Traffic Challan: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी क्रिकेटमुळे नव्हे, तर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे. रांची ट्रॅफिक पोलिसांनी ओव्हरस्पीडिंगमुळे धोनीवर दंडात्मक कारवाई केली आहे.

माहितीनुसार, रांचीतील वाहतूक विभागाने धोनीच्या वाहनाचा वेग मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे सांगितले आहे. त्यानंतर मोटार वाहन कायद्याच्या कलम 183 अंतर्गत त्याला 1,000 रुपयांचे ई-चलान पाठवण्यात आले आहे.

ट्रॅफिक सर्व्हेलन्समुळे कारवाई

रांची शहरात बसवण्यात आलेल्या ऑटोमॅटिक ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टीममुळे धोनीला दंड बसला आहे. ही घटना किरकोळ असली तरी महेंद्रसिंग धोनीशी संबंधित असल्यामुळे सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा होत आहे.

MS Dhoni Fined Overspeeding Ranchi
T20 World Cup: 'भारत फायनलला जाणार नाही', दिग्गज खेळाडूच्या भविष्यवाणीमुळे खळबळ; नेमकं काय म्हणाला?

याआधीही आली होती कायदेशीर नोटीस

काही दिवसांपूर्वी झारखंड राज्य गृहनिर्माण मंडळानेही धोनीला नोटीस पाठवली होती. रांचीतील हरमु रोडवरील निवासी भूखंडाचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून ही नोटीस देण्यात आली होती.

अधिकाऱ्यांच्या मते, हा भूखंड केवळ निवासी वापरासाठी देण्यात आला होता. मात्र त्या जागेचा व्यावसायिक वापर होत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. धोनी सध्या रांचीतील रिंग रोडवरील नवीन घरात राहत आहे.

MS Dhoni Fined Overspeeding Ranchi
T20 World Cup: अभिषेक Out, रिंकू In, इशान सलामीला येणार? इंग्लंड विरुद्धच्या सेमीफायनलसाठी भारताची Playing XI

आयपीएल 2026ची तयारी सुरू

दरम्यान, Indian Premier League 2026 हंगामाची तयारी सुरू झाली आहे. धोनीने चेन्नई सुपर किंग्स संघाच्या सराव शिबिरात सहभागी होत प्रशिक्षणाला सुरुवात केली आहे.

या सराव सत्रात संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि इतर भारतीय खेळाडूही उपस्थित होते. परदेशी खेळाडू आणि परदेशी प्रशिक्षक लवकरच संघात सामील होणार असल्याचे सांगितले जात आहे. सध्या सहाय्यक प्रशिक्षक श्रीधरन श्रीराम आणि राजीव कुमार तसेच स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग प्रशिक्षक ग्रेग किंग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव सत्र सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news