MS Dhoni Notice: मोठी बातमी! महेंद्रसिंह धोनीला हाउसिंग बोर्डाने पाठवली नोटीस; काय आहे प्रकरण?

MS Dhoni Ranchi Plot Misuse Notice: रांचीतील निवासी प्लॉटचा व्यावसायिक वापर केल्याच्या आरोपावरून महेंद्रसिंह धोनीला झारखंड हाउसिंग बोर्डाने नोटीस बजावली आहे. हरमू रोडवरील मालमत्तेत डायग्नोस्टिक सेंटर चालवल्याची माहिती आहे.
MS Dhoni Ranchi Plot Misuse Notice
MS Dhoni Ranchi Plot Misuse NoticePudhari
Published on
Updated on

MS Dhoni Ranchi Plot Misuse Notice: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला झारखंड स्टेट हाउसिंग बोर्डाने नियमभंग केल्यामुळे नोटीस बजावली आहे. रांचीतील हरमू रोड परिसरात निवासी वापरासाठी देण्यात आलेल्या प्लॉटचा व्यावसायिक कारणांसाठी वापर होत असल्याचा आरोप बोर्डाने केला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

झारखंड स्टेट हाउसिंग बोर्डाकडून धोनीला काही वर्षांपूर्वी निवासी वापरासाठी एक प्लॉट देण्यात आला होता. अशा प्लॉट्सवर केवळ राहण्यासाठी घर बांधणे आणि त्याचा निवासी वापर करणे ही अट असते. मात्र, त्या जागेचा व्यावसायिक वापर होत असल्याचे दिसून आले आहे, असा दावा बोर्डाने केला आहे.

MS Dhoni Ranchi Plot Misuse Notice
T20 World Cup 2026: भारत जिंकला तर सेमीफायनलमध्ये कोणत्या संघाशी होणार सामना? काय आहे समीकरण?

बोर्डाचे अध्यक्ष संजय लाल पासवान यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, "नियम आणि अटींचे उल्लंघन झाल्याचे प्राथमिक चौकशीत दिसून आले आहे. त्यामुळे धोनीला नोटीस पाठवण्यात आली आहे."

जागेचा कोणत्या कामासाठी वापर?

हरमू रोडवरील या मालमत्तेतून डायग्नोस्टिक सेंटर (वैद्यकीय तपासणी केंद्र) चालवले जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यानंतर बोर्डाने या आरोपांची चौकशी सुरू केली. निवासी प्लॉटवर कोणतेही व्यावसायिक सेंटर चालवणे नियमांनुसार बेकायदेशीर आहे. धोनी सध्या रांचीतील रिंग रोडवरील नव्या घरात वास्तव्यास आहे. हरमू रोडवरील घरात तो पूर्वी राहत होता.

MS Dhoni Ranchi Plot Misuse Notice
Rashmika Mandanna: रश्मिका मंदानाने मोडला विराट कोहलीचा विक्रम; लग्नाच्या पोस्टने सोशल मीडियावर धुमाकूळ

बोर्डाने दिलेल्या नोटीसला समाधानकारक उत्तर न दिल्यास संबंधित प्लॉटचा ताबा रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र, अंतिम निर्णय चौकशी अहवाल आणि धोनीकडून मिळालेल्या स्पष्टीकरणावर अवलंबून असेल.

याच परिसरात भाजपच्या राज्य कार्यालयाबाबतही निवासी प्लॉटचा अन्य कारणांसाठी वापर होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्या प्रकरणातही बोर्डाने नोटीस दिली असून चौकशी सुरू आहे. या प्रकरणावर महेंद्रसिंह धोनी किंवा त्याच्या प्रतिनिधींकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. त्यामुळे पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news