Cricket Rules Change: स्टंप उडाले, तरी फलंदाज OUT होणार नाही; क्रिकेटमधील बोल्डच्या नियमात मोठा बदल, पाहा Video

MCC Changes Cricket Rules: एमसीसीने क्रिकेटमधील बोल्ड होण्याच्या नियमात बदल केला असून, विशिष्ट परिस्थितीत स्टंप उडाले तरी फलंदाजाला बाद दिले जाणार नाही.
MCC Changes Cricket Rules
MCC Changes Cricket RulesPudhari
Published on: 
Updated on: 

MCC Changes Cricket Rules: क्रिकेटमध्ये फलंदाज बाद होण्याचे अनेक नियम आहेत. या नियमांमध्ये वेळोवेळी बदलही केले जातात. आता क्रिकेटमधील बोल्ड होण्याच्या नियमात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. क्रिकेटचे नियम ठरवणाऱ्या मेरिलबोन क्रिकेट क्लबने (MCC) हा बदल केला आहे. नव्या नियमानुसार, फलंदाजाने मारलेला चेंडू आधी नॉन-स्ट्रायकरच्या टोकावरील स्टंपला लागला आणि त्यानंतर लुढकत जाऊन फलंदाजाच्या टोकावरील स्टंपला लागला, तर फलंदाजाला बोल्ड दिले जाणार नाही. त्यामुळे अशा अनपेक्षित प्रकारे स्टंप उडाले, तरी फलंदाजाला बाद ठरवता येणार नाही.

नेमका काय आहे बोल्डच्या नियमातील बदल?

एमसीसीचे अध्यक्ष फ्रेझर स्टीवर्ट यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून या बदलाची माहिती दिली. एका ज्युनिअर काउंटी सामन्यात घडलेल्या घटनेमुळे हा नियम चर्चेत आला.

या सामन्यात एका फलंदाजाने फटका मारला. त्यानंतर चेंडू थेट नॉन-स्ट्रायकरच्या स्टंपला लागला. तेथून चेंडू लुढकत फलंदाजाकडे गेला आणि त्याने तिथले स्टंपही उडवले. या घटनेनंतर पंचांनी फलंदाजाला बाद घोषित केले.

जुन्या नियमानुसार, फलंदाजाला बाद देणे योग्य होते. मात्र, एमसीसीने आता या नियमात बदल केला आहे. नव्या नियमानुसार, चेंडू आधी नॉन-स्ट्रायकरच्या टोकावरील स्टंपला लागून त्यानंतर फलंदाजाच्या टोकावरील स्टंपला लागला, तर फलंदाजाला बोल्ड दिले जाणार नाही.

क्रिकेटमध्ये अशा घटना फार कमी घडतात. मात्र, अशा अनपेक्षित परिस्थितीत फलंदाजाला बाद ठरवण्याबाबत संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी एमसीसीने नियमात स्पष्टता आणली आहे.

एमसीसीने क्रिकेटच्या नियमांमध्ये आणखी कोणते बदल केले?

एमसीसीने बोल्डच्या नियमासोबतच क्रिकेटमधील इतर काही नियमांमध्येही बदल केले आहेत. हे बदल १ ऑक्टोबरपासून लागू झाले आहेत.

१. वेळ वाया घालवल्यास पाच धावांची पेनल्टी

फलंदाजाने पुढील चेंडू खेळण्यासाठी जाणूनबुजून वेळ वाया घालवला, तर त्याला सुरुवातीला दोन वेळा ताकीद दिली जाईल. त्यानंतरही त्याने वेळ वाया घालवण्याची कृती केल्यास क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला पाच पेनल्टी धावा दिल्या जातील.

MCC Changes Cricket Rules
Kainchi Dham: नीम करोली बाबांच्या कैंची धाममध्ये रोज केवळ २५ हजार भाविकांनाच प्रवेश; गर्दी नियंत्रणासाठी प्रशासनाचा प्रस्ताव

२. डे-नाइट कसोटीत गुलाबी चेंडू वापरण्याची मुभा

कसोटी क्रिकेटमध्ये गुलाबी चेंडू वापरण्याबाबतही बदल करण्यात आला आहे. दोन्ही संघांच्या कर्णधारांची सहमती असल्यास डे-नाइटऐवजी दिवसा खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यातही गुलाबी चेंडू वापरण्याची परवानगी असेल.

३. दिवसाच्या शेवटच्या षटकात फलंदाज बाद झाल्यास खेळ सुरू राहणार

कसोटी सामन्यात दिवसाचे शेवटचे षटक सुरू असताना एखादा फलंदाज बाद झाला, तरी सामना लगेच थांबवला जाणार नाही. त्याच्या जागी नवीन फलंदाज मैदानात येईल आणि षटकातील उरलेले चेंडू खेळले जातील. मात्र, दिवसाचा खेळ संपण्याची वेळ किंवा षटक पूर्ण होण्यासंबंधीचे लागू नियम यानुसार पुढील निर्णय घेतला जाईल.

MCC Changes Cricket Rules
Karachi Navratri Video: हा भारत नाही, पाकिस्तान आहे! कराचीत नवरात्रीचा जल्लोष; गरबा-दांडियाचा व्हिडिओ होतोय व्हायरल

क्रिकेटचे नियम अधिक स्पष्ट करण्याचा प्रयत्न

क्रिकेटमध्ये अनेकदा अशा घटना घडतात, ज्यामुळे पंचांना निर्णय घेणे कठीण होते. त्यामुळे खेळात स्पष्टता राहावी आणि अशा घटनांबाबत संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी एमसीसी वेळोवेळी नियमांमध्ये बदल करते. बोल्डच्या नियमातील हा बदलही त्याचाच भाग आहे. या बदलामुळे चेंडू अनपेक्षितपणे स्टंपला लागल्याच्या विशिष्ट परिस्थितीत फलंदाजाला बाद ठरवण्याबाबतचा नियम अधिक स्पष्ट झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news