

Lionel Messi Bomb Threat: अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला नुकत्याच झालेल्या फिफा वर्ल्डकपवेळी टार्गेट करण्याचा कट होता अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे. पोलिसांच्या डोसियरमध्ये मेस्सीला बॉम्बने उडवून देण्याचा प्लॅन असल्याचा दावा करण्यात आला आहे. सुरक्षा अहवालात देखील मेस्सी आणि इतर खेळाडूंना टार्गेट केले जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली होती.
स्पॅनिश आऊटलेट Informacion.es ने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेतील सुरक्षा एजन्सी आणि स्पर्धेत सहभागी झालेल्या देशातील अधिकाऱ्याचा एफबीआय समन्वय नेटवर्कशी संपर्क होता. ते टेरर अलर्टबाबत काम करत होते. पोलिसांनी सुरक्षेसंदर्भात दिलेल्या डोसियरमध्ये लिओनेल मेस्सी याच्याबाबत सर्वात जास्तवेळा धोक्याचा अलर्ट आला होता.
विशेष म्हणजे सर्वात मोठा थ्रेट हा डल्लासमधून आला. या ठिकाणी अर्जेंटिना आणि जॉर्डन यांनी सामना खेळला होता. डल्लास एअर पोर्टवर एका पुरूषाने संपर्क केला होता. त्याने दावा केला होता की तो आणि त्याचे अजून दोन सहकारी स्टेडियमच्या दिशेने होम मेड बॉम्ब आणि एआर-१५ घेऊन जात आहेत. या धोक्याचा इशारा पोलिसांना आणि दोन्ही संघातील खेळाडूंना देण्यात आला होता. मेस्सीचा यात विशेष उल्लेख करण्यात आला होता.
या डोसियरमध्ये अर्जेंटिना आणि इजिप्त यांच्यातील अटलांटा येथील सामन्यावेळी एक थ्रेट आला होता. त्यात एक एक्स युजरने मेस्सीसह संपूर्ण स्टेडियम आत्मघातकी स्फोटाचा हल्ला करून उडवून देण्याची धमकी दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मेस्सीला असलेला धोका हा ऑनलाईन मानहानीच्याही पुढे गेला होता. डल्लासमधील घटनेत तर फोन करणारा व्यक्ती आणि त्याचे दोन साथीदार हे स्टेडियमच्या दिशेने होम मेड बॉम्ब घेऊन जात असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यांनी खासकरून मेस्सीचे नाव टार्गेट म्हणून घेतले होते.
दुसऱ्या एका घटनते एक्स युजरने तो मेस्सीवर हल्ला करण्यासाठी चार बॉम्ब घेऊन जवळपास स्टेडियममध्ये पोहचलाच होता असा दावा केला होता.