Lionel Messi | पराभवानंतरही जिंकली मेस्सीने चाहत्यांची मने..!

Lionel Messi |
Lionel Messi | पराभवानंतरही जिंकली मेस्सीने चाहत्यांची मने..!Pamela Smith
Published on
Updated on

यूयॉर्क; वृत्तसंस्‍था : फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात स्पेनकडून झालेल्या पराभवानंतर न्यूयॉर्क न्यू जर्सी स्टेडियमवर जेव्हा विजेतेपदाचा सोहळा सुरू होता, तेव्हा जगातील कोट्यवधी नजरा आणि कॅमेरे मंचाकडे नव्हते. त्या नजरा खिळल्या होत्या गोलपोस्टच्या मागे उभ्या असलेल्या अर्जेंटिनाच्या हजारो चाहत्यांवर आणि पराभवामुळे हताश झालेल्‍या लाडक्‍या मेस्‍सीवर!

उपविजेतेपदाचे पदक स्वीकारल्यानंतर कर्णधार लिओनेल मेस्सी सर्वात आधी आपल्या चाहत्यांकडे वळला. पायातील बूट काढून, पाठीवर हात बांधून तो आपल्या सहकाऱ्यांसह शांतपणे उभा राहिला आणि त्याच्या डोळ्यांतून भावनांचा पूर वाहू लागला. ४५ दिवसांपूर्वी कॅन्सस सिटीमधून सुरू झालेला हा प्रवास अंतिम फेरीत संपला, तरी चाहत्यांनी खेळाडूंच्या शेवटच्या क्षणापर्यंतच्या लढवय्या वृत्तीचा सन्मान केला. जेव्हा स्पेनच्या रॉड्रीला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला, तेव्हाही अर्जेंटिनाच्या चाहत्यांनी मेस्सीचे हात उंचावून ‘मेस्सी... मेस्सी...’ असा गजर केला. आपल्या ६ व्या विश्वचषकानंतर मैदानात उभे असलेल्या मेस्सीकडे आता चाहत्यांची कोणतीही अपेक्षा नव्हती, ते फक्त त्याचे आभार मानत होते.

१० वर्षांपूर्वीचा तोच इतिहास; पण बदललेले चित्र!

ठीक १० वर्षांपूर्वी, २०१६ मध्ये याच स्टेडियमवर कोपा अमेरिका कपच्या अंतिम सामन्यात चिलीकडून झालेल्या पराभवानंतर चित्र पूर्णपणे वेगळे होते. पेनल्टी चुकवल्यानंतर निराश झालेल्या मेस्सीने त्याच रात्री आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून संन्यास घेण्याची घोषणा केली होती. मात्र, १० वर्षांनंतर पराभवाची तीच वेदना असली, तरी परिस्‍थिती वेगळी होती. २०१६ मधील त्या एकाकी मेस्सीला आज २०२६ मध्ये संपूर्ण अर्जेंटिना आपल्या कवेत घेऊन उभा होता.

मेस्‍सीला ‘सिल्‍व्‍हर बॉल’, ‘सिल्‍व्‍हर बूट’

अंतिम सामन्यात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीला ‘सिल्व्हर बॉल’ आणि ‘सिल्व्हर बूट’ पुरस्कार मिळाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news