Lionel Messi | मेस्‍सीला रोखण्‍यासाठी स्‍पेनचा काय होता गेम प्‍लॅन?

स्पेनचे मेसीला रोखण्याचे प्रयत्न
Lionel Messi  |
Lionel Messi | मेस्‍सीला रोखण्‍यासाठी स्‍पेनचा काय होता गेम प्‍लॅन?
Published on
Updated on

एका बाजूला मैदानावर १० खेळाडू उरल्यामुळे बॅकफूटवर गेलेला अर्जेंटिना आणि दुसऱ्या बाजूला विश्वविजेतेपदाच्या महत्त्वाकांक्षेने आसूसलेला स्पेन! निर्धारित ९० मिनिटांचा खेळ गोलशून्‍य बरोबरीत सुटल्‍याने अवांतर वेळेचा अवलंब झालेला.... स्‍पेनचा संघ एकावर एक हल्‍ले चढवत होता; पण अर्जेंटिनाचा गोलरक्षक ते यशस्‍वीरीत्‍या परतवतही होता; पण सामन्‍यात एक क्षण असाही आला, ज्‍यावेळी अर्जेंटिनाचा गोलरक्षक चकला, टोरेसने गोलजाळ्याचा अचूक वेध घेतला आणि अर्जेंटिनाची भक्‍कम तटबंदी शब्‍दश: फोडून निघाली. स्‍पेन १६ वर्षांनंतर पुन्‍हा एकदा जगज्‍जेता झाला.

मेस्‍सीला रोखण्‍यासाठी चक्रव्यूह

मॅन-मार्किंग आणि चक्रव्यूह : मेस्सीकडे जेव्हा जेव्हा चेंडू गेला, तेव्हा स्पेनच्या दोन ते तीन खेळाडूंनी त्याला लगेच घेरले. त्यामुळे त्याला स्‍पेस मिळत नव्‍हती.

पासेसची लाईन तोडणे : स्पेनच्या मिडफिल्डर्सनी रोड्रिगो डी पॉल आणि अलेक्सिस मॅक अ‍ॅलिस्टर यांच्याकडून मेस्सीकडे येणारे पासेस मध्येच रोखले. मेस्सीला चेंडूच मिळू न देणे हा त्यांचा मुख्य हेतू होता.

आक्रमक टॅकलिंग : मेस्सीने ड्रिबलिंग करण्याचा प्रयत्न करताच स्पेनच्या मध्यवर्ती बचावपटूंनी अत्यंत अचूक आणि शारीरिकदृष्ट्या आक्रमक टॅकल करून त्याचा वेग रोखला होता.

सामूहिक बचाव : मेस्सीला केवळ एका व्यक्तीने रोखणे अशक्य आहे. त्यामुळे स्पेनने संपूर्ण संघ म्हणून बचाव करण्याची नीती अवलंबली. स्पेनचा मुख्य भर मेस्सीकडे चेंडू जाण्यापूर्वीच त्याच्या 'पासिंग लेन' बंद करणे आणि त्याला मोकळी जागा न देणे हा होता. जेणेकरून त्याला धोकादायक पद्धतीने आक्रमण करण्याची संधी मिळणार नाही.

अर्जेंटिनाचा गोलरक्षक ठरला तारणहार, पण...

स्पेनने ६५ % बॉल पोझेशनसह खेळावर पूर्ण नियंत्रण ठेवताना अर्जेंटिनाच्या गोलपोस्टवर तब्बल १४ शॉटस (८ शॉटस्‌ ऑन टारगेट) मारले; मात्र अर्जेंटिनाचा गोलकीपर एमिलियानो मार्टिनेझने ८ उत्कृष्ट सेव्हज करत स्पेनला गोल करण्यापासून रोखून धरलेे. लिओनेल मेस्‍सीला स्पेनच्या बचावपटूंनी कोणतीही मोकळी जागा न दिल्यामुळे त्याला एकही गोल किंवा शॉट ऑन टार्गेट मारता आलेला नव्‍हता. अंतिमत: येथे स्पेनने बाजी मारली.

एनझो फर्नांडिसला रेड कार्ड

सामन्याच्या ९० व्या मिनिटाला अर्जेंटिनाचा स्टार मिडफिल्डर एनझो फर्नांडिसला दुसरे रेड कार्ड मिळाल्यामुळे त्याला मैदानाबाहेर जावे लागले. त्यामुळे अर्जेंटिनाला उवरित वेळेत १० खेळाडूनिशी खेळणे भाग होते.

फायनलमध्‍ये रंगला दोन पिढ्यांचा संघर्ष

३९ वर्षांचा मेस्‍सी व १९ वर्षांचा यमाल हे सुपरस्‍टार खेळाडू या निमित्ताने फायनलमध्‍ये आमनेसामने उभे ठाकले असल्‍याने याकडे 'ड्रीम फायनल' म्हणून पाहिले गेले. एकीकडे फुटबॉल सम्राट मेस्सी सलग दुसऱ्या जेतेपदासाठी महत्त्वाकांक्षेने मैदानात उतरला होता, तर युवा सन्‍सेशन युवा स्टार लॅमिन यमालही ताज्या दमाने खेळणार असल्‍याने या फायनलमध्‍ये दोन पिढ्यांचा संघर्ष चांगलाच रंगला!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news