KL Rahul SL vs IND: केएल राहुलला अचानक काय झालं... टी ब्रेकनंतर सोडलं मैदान, कर्णधाराला सावरावा लागला डाव

KL Rahul SL vs IND
KL Rahul SL vs INDpudhari
Published on
Updated on

KL Rahul Retired hurt SL vs IND: श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने दमदार सुरूवात केली. यशस्वी जयस्वाल स्वस्तात माघारी परतल्यानंतर देवदत्त पडिक्कल आणि केएल राहुल यांनी चांगली फलंदाजी करत भारताला २०० धावांचा टप्पा पार करून दिला. मात्र चहापाणानंतर अचानक केएल राहुलने मैदान सोडलं अन् कर्णधार शुभमन गिलला फलंदाजी करायला यावं लागलं. त्यामुळं केएल राहुलला नेमकं काय झालं असा प्रश्न सर्वांना पडला होता.

KL Rahul SL vs IND
KL Rahul retirement: केएल राहुल निवृत्ती घेणार? म्हणाला, "क्रिकेटच सर्वस्व नाही..."

ज्यावेळी केएल राहुलने मैदान सोडलं त्यावेळी तो ७७ धावांवर खेळत होता. त्याची आणि देवदत्त पडिक्कल जोडी चांगली जमली होती. मात्र राहुलला हातात क्रॅम्प्स येऊ लागले. त्याला वेदाना असहाय्य झाल्यामुळं त्याने पॅव्हेलियनमध्ये परत जाण्याचा निर्णय घेतला.

ज्यावेळी चहापानानंतर पडिक्कल आणि राहुल पुन्हा मैदानात आले. त्यावेळी केएल राहुलच्या हातात क्रॅम्प येऊ लागले. त्यानंतर श्रीलंकेचा कर्णधार धनंजय डी डीसिल्वाने त्याचा हात स्ट्रेच करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या वेदना अजून वाढल्या. त्यानंतर फिजिओसोबत राहुलने मैदान सोडले.

KL Rahul SL vs IND
KL Rahul vs Virat Kohli : राहुलचा तो एक षटकार अन् विराट कोहलीचा विक्रम मोडीत; आता केवळ धोनीच आहे पुढे

पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात राहुल आणि पडिक्कल खूप संयमाने खेळत डाव पुढे नेत होते दोघांनी आपापली अर्धशतके पूर्ण केली होती. लंकेची टीम पूर्णपणे बॅकफूटला गेली होती. राहुल १६२ चेंडूत ७७ धावांवर खेळत होता. मात्र या दुखापतीमुळे त्याला बाहेर जावे लागले. चाहत्यांना आशा आहे की त्याची दुखापत फार गंभीर नसेल अन् तो फलंदाजीला पुन्हा येईल आणि शतक पूर्ण करेल.

दुसरीकडं देवदत्त पडिक्कलने आक्रमक फलंदाजी करत १३४ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. हे त्याचे कसोटीमधील पहिले शतक होते.

KL Rahul SL vs IND
KL Rahul vs Sachin Tendulkar : केएल राहुल 24 धावा करताच तेंडुलकरला मागे टाकणार! ‘केनिंग्टन ओव्हल’ कसोटीत सुवर्णसंधी

तत्पूर्वी यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी ४७ धावांची भागीदारी केली होती. यशस्वी चांगल्या लयीत दिसत होता मात्र तो गोलंदाजाला धडकला आणि दुर्दैवी पद्धतीनं तो धावबाद झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news