KL Rahul vs Sachin Tendulkar : केएल राहुल 24 धावा करताच तेंडुलकरला मागे टाकणार! ‘केनिंग्टन ओव्हल’ कसोटीत सुवर्णसंधी

KL Rahul केनिंग्टन ओव्हलवर सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे.
kl rahul vs sachin tendulkar
Published on
Updated on

केएल राहुल इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत उत्कृष्ट कामगिरी करत असून त्याच्या बॅटमधून भरपूर धावा निघत आहेत. चौथ्या कसोटी सामन्यातही त्याने झुंजार 90 धावांची खेळी साकारली होती आणि सामना अनिर्णित राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. इंग्लंडविरुद्धच्या या कसोटी मालिकेत त्याच्या खात्याय आतापर्यंत 511 धावा जमा झाल्या आहेत.

सचिनला मागे टाकण्याची संधी

राहुलने केनिंग्टन ओव्हलच्या मैदानावर आतापर्यंत एकूण 249 कसोटी धावा केल्या आहेत, ज्यामध्ये एका शतकाचा समावेश आहे. तो केनिंग्टन ओव्हलवर सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे. त्याच्याकडे महान फलंदाज सचिन तेंडुलकरला मागे टाकण्याची संधी आहे. यासाठी त्याला केवळ 24 धावांची आवश्यकता आहे. तेंडुलकरने केनिंग्टन ओव्हलच्या मैदानावर 272 कसोटी धावा केल्या आहेत.

kl rahul vs sachin tendulkar
WI vs AUS T20 series : वेस्ट इंडिजची मायदेशात धुळधाण! कसोटीनंतर T20 मालिकेत लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाने 5-0ने चिरडले

केनिंग्टन ओव्हल मैदानावर सर्वाधिक कसोटी धावा करणारे भारतीय फलंदाज :

  • राहुल द्रविड : 443 धावा

  • सचिन तेंडुलकर : 272 धावा

  • रवी शास्त्री : 253 धावा

  • केएल राहुल : 249 धावा

  • गुंडप्पा विश्वनाथ : 241 धावा

kl rahul vs sachin tendulkar
KL Rahul Record : मँचेस्टर कसोटीत केएल राहुलचा नवा पराक्रम! इंग्लंडमध्ये 1000 कसोटी धावा पूर्ण

इंग्लंडमध्ये राहुलची चार कसोटी शतके

केएल राहुलने आतापर्यंत इंग्लंडच्या भूमीवर एकूण चार कसोटी शतके झळकावली आहेत. सचिन तेंडुलकरनेही इंग्लंडमध्ये एकूण चार कसोटी शतके नोंदवली होती. आता जर राहुलने पाचव्या कसोटीत शतक झळकावले, तर तो इंग्लंडमध्ये सर्वाधिक कसोटी शतके करण्याच्या बाबतीतही सचिनला मागे टाकेल.

2014 मध्ये भारतीय संघाकडून कसोटी पदार्पण

केएल राहुलने 2014 साली भारतीय संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून त्याने संघासाठी 62 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 3768 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 10 शतके आणि 19 अर्धशतकांचा समावेश आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 3043 धावांची नोंद आहे.

kl rahul vs sachin tendulkar
KL Rahul Century at Lord's | के. एल. राहुलचे शानदार शतक; लॉर्ड्सवर दुसऱ्यांदा केली कामगिरी..

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news