Kieron Pollard Fined BCCI: मुंबईनं सामना जिंकला मात्र पोलार्डनं बोलून 'घाण' केली... BCCI जाम भडकली, थेट कारवाई केली

Kieron Pollard Fined BCCI
Kieron Pollard Fined BCCIpudhari
Published on
Updated on

Kieron Pollard Fined BCCI : आयपीएल २०२६ च्या हंगामात मुंबई इंडियन्स जरी गुणतालिकेत तळातील दोन संघात समाविष्ट असली तरी फेअर प्ले अवॉर्डमध्ये मुंबई इंडियन्सचा संघ अव्वल स्थानावर आहे. नुकताच्या झालेल्या पंजाब किंग्जविरूद्धच्या सामन्यात मुंबईने विजय मिवळत श्रेयस अय्यरला चांगलेच टेन्शन दिलं. मात्र असं असलं तरी मुंबईला बीसीसीआयनं एक मोठा धक्का दिला. बीसीसीआयने मुंबईचा बॅटिंग कोच कायरन पोलार्डवर करवाई केली आहे. पोलार्डचा चौथ्या अंपायरसोबत वाद झाला होता.

Kieron Pollard Fined BCCI
Hardik Pandya Angry MIvsPBKS: आता निर्णय घ्यावाच लागेल... कर्णधार पांड्या भडकला, तीन दिग्गजांपैकी कोण हार्दिकच्या रडारवर?

असभ्य भाषेचा वापर

पंजाब किंग्जविरूद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्स फलंदाजी करताना १९ व्या षटकात पोलार्ड हा असभ्य भाषा वापरताना दिसला. त्यामुळं बीसीसीआयने त्याच्यावर कारवाई करत त्याच्या सामन्याच्या मानधनातून १५ टक्के रक्कम कापून घेतली आहे. त्याचबरोबर पोलार्डला दोन डिमेरीट पॉईंट देखील देण्यात आले आहेत. यंदाच्या हंगामात नियमभंग करणाऱ्या खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांची यादी मोठी आहे.

काय म्हणाले आयपीएल प्रशासन?

आयपीएलने आपल्या अधिकृत वक्तव्यात म्हणाते की, 'मुंबई इंडियन्सचा बॅटिंग कोच कायरन पोलार्डला त्याच्या मॅच फीमधील १५ टक्के रक्कम दंड म्हणून ठोठावण्यात आली आहे. त्याचबरोबर त्याला आयपीएल कोड ऑफ कंडक्टचे स्तर १ चे उल्लंघन केल्याप्रकरणी एक डिमेरीट पॉईंट देखील देण्यात आला आहे.

आयपीएल पुढे म्हणते, 'पोलार्डने आयपीएल कोड ऑफ कंडक्टचे कलम २.३ चे उल्लंघन केलं आहे. हे कलम सामन्यावेळी असभ्य भाषेचा वापर करण्याबाबत आहे. ही घटना दुसऱ्या डावातील १९ व्या षटकात घडली होती. त्यावेळी पोलार्डने चौथ्या पंचांविरूद्ध असभ्य भाषेचा वापर केला होता. पोलार्डने सामनाधिकारी पंकज धर्मानी यांच्याकडे आपला गुन्हा मान्य केला आहे.'

Kieron Pollard Fined BCCI
Hardik Pandya CSK Vs MI: चेन्नईकडून 'सर्वात मोठा' पराभव झाल्यावर हार्दिक पांड्यानं खापर कोणाच्या डोक्यावर फोडलं?

१८ व्या षटकात चित्र पालटलं

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जचा सहा विकेट्सनी पराभव केला. यामुळं पंजाबचे प्ले ऑफ गाठण्याच्या स्वप्नाला मोठा धक्का बसला आहे. मुंबईने पंजाबचे २०१ धावांचे आव्हान पार केले. मुंबईने हा सामना एक चेंडू शिल्लक ठेवून जिंकला. तिलक वर्माने ३३ चेंडूत नाबाद ७५ धावांची खेळी केली. त्याल विल जॅक्सने १० चेंडूत २५ धावा ठोकल्या होत्या.

पंजाबने सामन्यावर १८ व्या षटापर्यंत नियंत्रण ठेवलं होतं. मात्र १८ व्या षटकात मार्को येनसेनने २२ धावांची लूट केली अन् सामन्याचं चित्रच पालटलं.

Kieron Pollard Fined BCCI
IPL 2026 | 'धोनी खेळणार का? : CSK vs MI सामन्यापूर्वी आर. अश्विनचे मोठे विधान

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news