Kevin Pietersen Prediction: फायनलमध्ये कोण जाणार? भारत-इंग्लंड सेमीफायनलपूर्वी केविन पीटरसनची मोठी भविष्यवाणी

Kevin Pietersen Prediction: टी-20 विश्वचषकाच्या सेमीफायनलपूर्वी इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसनने मोठी भविष्यवाणी केली आहे. त्याच्या मते, भारताचा पराभव करत इंग्लंड अंतिम फेरीत पोहोचेल आणि न्यूझीलंडविरुद्ध फायनल खेळेल.
Kevin Pietersen Prediction
Kevin Pietersen PredictionPudhari
Published on
Updated on

Kevin Pietersen Prediction India vs England T20 World Cup Semi Final:

टी-20 विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारत आणि इंग्लंड यांच्यात आज मोठी लढत होणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे. या सामन्याचा विजेता अंतिम फेरीत न्यूझीलंडचा सामना करणार आहे.

न्यूझीलंड आधीच फायनलमध्ये

टी-20 विश्वचषकाच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेवर 9 विकेट्सने विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. कोलकात्यातील Eden Gardens येथे झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने एकतर्फी विजय मिळवला. आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील सेमीफायनलचा विजेता न्यूझीलंडशी खेळणार आहे. हा सामना 8 मार्च रोजी अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

केविन पीटरसनची भविष्यवाणी

या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी इंग्लंडचा माजी दिग्गज फलंदाज केविन पीटरसनने मोठी भविष्यवाणी केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत पीटरसनने सांगितले की अंतिम सामना न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात होईल.

त्याच्या मते इंग्लंडचा संघ सेमीफायनलमध्ये भारताचा पराभव करेल आणि फायनलमध्ये न्यूझीलंडला भिडेल. त्याने लिहिले की, “रविवारी टी-20 वर्ल्ड कपचा फायनल सामना न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड असा होईल आणि तो एक शानदार सामना असेल.”

भारत-इंग्लंड सेमीफायनलचा इतिहास

भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 विश्वचषकातील सेमीफायनल सामने नेहमीच चर्चेचा विषय ठरले आहेत. 2024 च्या टी-20 विश्वचषकात भारताने इंग्लंडचा 68 धावांनी पराभव करत बदला घेतला होता. त्या आधी 2022 मध्ये इंग्लंडने भारताला 10 विकेट्सने हरवत स्पर्धेतून बाहेर काढले होते. यामुळे आजचा सामना दोन्ही संघांसाठी प्रतिष्ठेचा असणार आहे.

Kevin Pietersen Prediction
IND vs ENG Semi-Final: मुंबईत 39 वर्षांनी भारत-इंग्लंड सेमीफानलमध्ये भिडणार, शेवटचा सामना कोणी जिंकला होता? काय आहे इतिहास?

पीटरसनचे आंतरराष्ट्रीय करिअर

केविन पीटरसन हा इंग्लंडच्या इतिहासातील सर्वात आक्रमक फलंदाजांपैकी एक मानला जातो. त्याने 2004 मध्ये इंग्लंडसाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याच्या कारकिर्दीत त्याने 104 कसोटी, 136 एकदिवसीय आणि 37 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले.

कसोटीमध्ये त्याने 8,181 धावा केल्या, तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 4,440 आणि टी-20 मध्ये 1,176 धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 23 शतके आणि 35 अर्धशतके आहेत, तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 9 शतके आणि 25 अर्धशतके आहेत.

Kevin Pietersen Prediction
Watch Markram Catch: ...तर दक्षिण आफ्रिका फायनलला गेली असती; मिशेलच्या कॅचमुळे होतोय वाद, थर्ड अंपायरचा निर्णय चुकला?

सर्वांचे लक्ष सेमीफायनलकडे

आता सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष भारत-इंग्लंड या हाय-व्होल्टेज सेमीफायनलकडे लागले आहे. पीटरसनची भविष्यवाणी खरी ठरणार की भारत पुन्हा इतिहास घडवणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news