IND vs ENG Semi-Final: मुंबईत 39 वर्षांनी भारत-इंग्लंड सेमीफानलमध्ये भिडणार, शेवटचा सामना कोणी जिंकला होता? काय आहे इतिहास?

India vs England Semi-Final: टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात भारत आणि इंग्लंड 39 वर्षांनंतर मुंबईच्या वानखेडे मैदानावर पुन्हा आमनेसामने येणार आहेत. 1987 च्या वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये इंग्लंडने भारताचा पराभव केला होता.
India vs England Semi Final History Wankhede World Cup
India vs England Semi Final History Wankhede World CupPudhari
Published on
Updated on

India vs England Semi Final History Wankhede World Cup: टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारत आणि इंग्लंड यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मोठी लढत होणार आहे. विशेष म्हणजे तब्बल 39 वर्षांनंतर या मैदानावर दोन्ही संघ वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. त्यामुळे या सामन्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

1987 च्या वर्ल्ड कपची आठवण

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यात शेवटचा वर्ल्ड कप सेमीफायनल सामना 1987 मध्ये खेळला गेला होता. त्या वेळी हा एकदिवसीय विश्वचषक होता, ज्याला ‘रिलायन्स वर्ल्ड कप’ म्हणून ओळखले जात होते.

त्या सामन्यात इंग्लंडच्या ग्रॅहम गूच यांनी शानदार शतक झळकावले होते. इंग्लंडने 6 विकेट गमावत 254 धावा काढल्या होत्या. भारत त्या वेळी कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली खेळत होता. मात्र भारतीय संघ 219 धावांवर बाद झाला आणि इंग्लंडने सामना जिंकत अंतिम फेरी गाठली.

टी-20 विश्वचषकातील भारत-इंग्लंड लढती

टी-20 विश्वचषकात भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामने नेहमीच रोमांचक ठरले आहेत. आतापर्यंत दोन्ही संघ दोन वेळा उपांत्य फेरीत भिडले आहेत.

2022 मध्ये अ‍ॅडलेड येथे झालेल्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडने भारतावर 10 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला होता. जोस बटलर आणि अ‍ॅलेक्स हेल्स यांनी भारतीय गोलंदाजांवर जोरदार हल्ला करत सामना एकतर्फी फिरवला होता. यानंतर इंग्लंडने अंतिम फेरीत पाकिस्तानचा पराभव करून टी-20 विश्वचषक जिंकला.

India vs England Semi Final History Wankhede World Cup
Watch Markram Catch: ...तर दक्षिण आफ्रिका फायनलला गेली असती; मिशेलच्या कॅचमुळे होतोय वाद, थर्ड अंपायरचा निर्णय चुकला?

2024 मध्ये भारताचा बदला

2024 मध्ये जॉर्जटाउनच्या प्रोव्हिडन्स स्टेडियमवर भारताला बदला घेण्याची संधी मिळाली. त्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 171 धावा केल्या. रोहित शर्माने 57 धावांची महत्त्वाची खेळी केली, तर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांनीही योगदान दिले. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत इंग्लंडला 103 धावांवर रोखले.

कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या, तर जसप्रीत बुमराहने दोन विकेट्स घेत भारताला 68 धावांनी विजय मिळवून दिला. पुढे भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवत विश्वचषक जिंकला.

इतिहासातील खास ट्रेंड

विशेष बाब म्हणजे भारत आणि इंग्लंड यांच्यातील सेमीफायनल जिंकणाऱ्या संघाने पुढे जाऊन विश्वचषक जिंकला आहे. 2022 मध्ये इंग्लंड आणि 2024 मध्ये भारताने ही कामगिरी केली. यामुळे यंदाच्या सेमीफायनल सामन्याबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

India vs England Semi Final History Wankhede World Cup
Sanju Samson Ban: भारताला मोठा धक्का! संजू सेमिफायनल खेळणार नाही? सॅमसन बॅन ट्रेंडिंगमध्ये, काय आहे कारण?

हेड-टू-हेड आकडे

टी-20 विश्वचषकात भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत पाच सामने झाले आहेत. त्यापैकी भारताने तीन सामने जिंकले, तर इंग्लंडने दोन सामने जिंकले आहेत. या ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे मुंबईतील उपांत्य सामना अधिकच रोमांचक ठरणार असल्याचे मानले जात आहे. भारताला घरच्या मैदानाचा फायदा मिळू शकतो, तर इंग्लंडही पुन्हा इतिहास घडवण्याच्या प्रयत्नात असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news