Kavya Maran Sunrisers Leeds: पाकिस्तानी खेळाडूला खरेदी करणारी काव्याची सनराईजर्स चांगलीच अडकली; संघाचं अकाऊंटच झालं सस्पेंड

The Hundreds 2026 Auction: अबरार अहमदला खरेदी करताना काव्या देखील होती ऑक्शन टेबलवर
Kavya Maran Sunrisers Leeds
Kavya Maran Sunrisers Leedspudhari
Published on
Updated on

Kavya Maran Sunrisers Leeds: इंग्लंडची फ्रेंचायजी लीग द हंड्रेडसाठी नुकताच लिलाव पार पडला. यावेळी आयपीएल संघ मालकांनी आपल्या द हंड्रेडमधील संघात पाकिस्तानी खेळाडूंना घेण्याचं टाळलं. मात्र याला काव्या मारन यांची सनराईजर्स हैदराबाद अपवाद ठरली. त्यांनी पाकिस्तानी मिस्ट्री स्पिनर अबरार अहमदला १.९० लाख पाऊंडमध्ये म्हणजे जवळपास २.३४ कोटी रूपयात खरेदी केलं. (The Hundreds 2026 Auction)

यानंतर सोशल मीडियावर काव्या मारनच्या सनराईजर्स हैदराबादबाबत एक चर्चा सुरू होती. कारण द हंड्रेड स्पर्धेतील भारतीय मालक असलेल्या संघानं पहिल्यांदाच पाकिस्तानी क्रिकेटपटूला करारबद्ध केलं.

क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजी

अबरार अहमदला खरेदी केल्यानंतर भारतात अनेक क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली. अनेक चाहत्यांनी सनराईजर्स हैदराबाद आणि त्याची सीईओ काव्या मारनला टार्गेट केलं. पाकिस्तानी खेळाडूला करारबद्ध करणं ही राष्ट्रीय भावनेच्या विरोधातील कृती असल्याचं त्याचं मत होतं.

आयपीएलमध्ये २००८ नंतर एकही पाकिस्तानी खेळाडू खेळला नाही. मग भारतीय मालकी असलेल्या संघानं असं पाऊल का उचललं असा सवाल केला. भारत - पाकिस्तान यांच्यातील राजकीय तणाव असल्यानं २००८ पासून पाकिस्तानचे खेळाडू आयपीएलमध्ये खेळत नाहीयेत.

काव्या मारन स्वतः उपस्थित

लंडनमध्ये झालेल्या या लिलावावेळी काव्या मारन स्वतः ऑक्शन टेबलवर उपस्थित होती. तिच्या जोडीला संघाचे मुख्य प्रशिक्षक डॅनियल व्हिटोरी देखील होता. सनराईजर्स लीड्सने लिलावात ट्रेंट रॉकेट्सला मागे टाकत अबरार अहमदला आपल्या संघात घेतलं.

मात्र याचा फटका देखील सनराईजर्स लीड्सला झाला. सनराईजर्स लीड्सचं अधिकृत एक्स अकाऊंट सस्पेंड झालं. प्लॅटफॉर्मकडून त्यांचे अकाऊंट कोणत्या कारणासाठी सस्पेंड करण्यात आलं आहे याचं कारण स्पष्ट करण्यात आलेलं नाही.

सनराईजर्स लीड्सची मालकी ही भारतीय माध्यम कंपनी सन ग्रुपकडे आहे. याचे नेतृत्व उद्योगपती कलानिधी मानर करतात. गेल्या वर्षी ग्रुपने सनराईजर्स लीड्सची पूर्ण हिस्सेदारी मिळवली होती. यापूर्वी हा संघ नॉर्दर्न सुपरचार्जर्सच्या नावाने ओळखला जात होता.

व्हिटोरीचे स्पष्टीकरण

सनराईजर्स लीड्सचे प्रमुख कोच डॅनियल व्हिटोरीने सांगितलं की ऑस्ट्रेलियन खेळाडूंकडून अबरार अहमदच्या बाबतीत सल्ला घेण्यात आला होता. त्याची मिस्ट्री गोलंदाजी पाहून त्याला टीमने खरेदी करण्याचा निर्णय घेतला. व्हिटोरीने टीम मॅनेजमेंटने पाकिस्तानी खेळाडूंना घ्यायचं आहे की नाही याबाबत वेगळी बैठक घेतली नव्हती.

द हंड्रेड २०२६ च्या हंगमासाठी झालेल्या लिलावात सोल्ड होणारा अबरार अहमद हा दुसरा पाकिस्तान खेळाडू आहे. त्यापूर्वी पाकिस्तानचा उस्मान तारिक याला बर्मिंघम फोनिक्सने जवळपास १.४० लाख पाऊंड म्हणजे १.७२ कोटी रूपयाला खरेदी केलं होतं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news