धवनच्या जागी के. एल. राहुल कर्णधार ; बीसीसीआयच्या निर्णयावर चाहते नाराज

धवनच्या जागी के. एल. राहुल कर्णधार ; बीसीसीआयच्या निर्णयावर चाहते नाराज
Published on
Updated on

नवी दिल्ली : पीटीआय अनुभवी फलंदाज के एल राहुलला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वैद्यकीय पथकाने गुरुवारी तंदुरुस्ती जाहीर केल्यानंतर आगामी झिम्बाब्वे दौर्‍यासाठी त्याची भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली. झिम्बाब्वेमध्ये होणार्‍या तीन सामन्यांच्या (18, 20, 22 ऑगस्ट) एकदिवसीय मालिकेसाठी आधी डावखुरा सलामीवीर शिखर धवनकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले होते. मात्र, हा निर्णय चाहत्यांना पटलेला नाही. त्यांनी धवनवर हा अन्याय असल्याचे म्हणत बीसीसीआयवर टीकेची झोड उठवली आहे.

शिखर धवन संघातील सिनिअर खेळाडू आहे. याआधी देखील त्याने संघाचे नेतृत्व केले आहे. पण राहुल भारतीय संघाचा नियमित उपकर्णधार आहे, तो संघात परत येताच शिखर धवनकडून कर्णधारपद काढून घेण्यात आले हे काही चाहत्यांना पटलेले नाही.

केएल राहुलचे संघात आगमन झाल्याने चाहते आनंदी आहेत. पण ज्या पद्धतीने शिखरला कर्णधारपदावरून हटवण्यात आले ते चुकीचे होते, असे चाहत्यांना वाटत आहे. राहुल हा शिखरपेक्षा ज्युनिअर आहे. दुखापतीनंतर तो संघात परतलाय. अशा स्थितीत शिखरकडे नेतृत्व देता आले असते आणि उपकर्णधार म्हणून राहुल संघात राहिला असता. नियमित उपकर्णधार असलेला राहुल भविष्यात कर्णधार होऊ शकतो.

आता राहुलकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आल्याने धवन उपकर्णधारपद सांभाळेल. राहुल मे महिन्यात झालेल्या 'आयपीएल'नंतर एकही सामना खेळलेला नाही. त्याला सुरुवातीला दुखापतीमुळे मैदानाबाहेर राहावे लागले होते आणि त्याच्यावर शस्त्रक्रियाही झाली. त्यातून सावरल्यानंतर तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेत खेळणार होता; परंतु त्यापूर्वी त्याला करोनाची बाधा झाल्याने त्याचे पुनरागमन लांबणीवर पडले.

चकब्वा झिम्बाब्वेचा कर्णधार

नियमित कर्णधार क्रेग एर्व्हाइन पायाच्या दुखापतीमुळे भारताविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी मुकणार असून यष्टिरक्षक-फलंदाज रेगिस चकब्वा झिम्बाब्वेचे नेतृत्व करेल.

भारतीय संघ : केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news