IPL 2026 Salary: रोहित-कोहली की धोनी, IPL 2026 मध्ये सर्वाधिक पैसे कोणाला मिळालेत? आकडा वाचून थक्क व्हाल

IPL 2026 Player Salaries: IPL 2026 मध्ये विराट कोहली, रोहित शर्मा आणि एमएस धोनी यांच्यात कमाईत मोठा फरक आहे. कोहलीला सर्वाधिक 21 कोटी रुपये, रोहितला 16.30 कोटी, तर धोनीला 4 कोटी मिळणार आहेत.
IPL 2026 Player Salaries
IPL 2026 Player SalariesPudhari
Published on
Updated on

IPL 2026 Player Salaries: IPL 2026 चा हंगाम सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा तीन दिग्गजांवर आहेत. विराट कोहली, रोहित शर्मा आणि एम एस धोनी. तिघांचाही क्रिकेटमधील चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे, पण यंदाच्या हंगामात सर्वाधिक कमाई कोण करत आहे, हा प्रश्न चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

सर्वप्रथम महेंद्रसिंह धोनीबद्दल बोलायचं झालं, तर तो Chennai Super Kings कडून खेळणार असून यंदा त्याला फक्त 4 कोटी रुपये मिळणार आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन पाच वर्षांहून अधिक काळ झाल्यामुळे BCCI च्या नियमांनुसार त्याला ‘अनकॅप्ड’ खेळाडू म्हणून मिनी ऑक्शनमध्ये ठेवण्यात आलं. त्यामुळे त्याच्या मानधनात मोठी घसरण झाली आहे.

IPL 2026 Player Salaries
RCB IPL 2026: आरसीबी सलग 2-3 ट्रॉफी जिंकू शकते, विराट कोहलीचं कौतुक करत कोणी केली भविष्यवाणी?

दुसरीकडे रोहित शर्मा मुंबई इंडियन्स कडून खेळणार असून त्याला IPL 2026 मध्ये 16.30 कोटी रुपये मिळणार आहेत. मुंबई इंडियन्सचं नेतृत्व आता हार्दिक पांड्या करत असला, तरी रोहितचा अनुभव आणि योगदान अजूनही संघासाठी महत्त्वाचं आहे.

या तिघांमध्ये सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू म्हणजे विराट कोहली. Royal Challengers Bengaluru ने त्याला 21 कोटी रुपयांत रिटेन केलं असून IPL 2026 मध्येही तेवढीच रक्कम त्याला मिळणार आहे. त्यामुळे कोहली हा यंदाच्या हंगामात या तिघांपैकी सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू आहे.

IPL 2026 Player Salaries
IPL Dot Balls Record: IPL मधील अनोखा रेकॉर्ड; 31 बॉल, एकही रन नाही, कोण आहे हा फलंदाज?

कामगिरीच्या बाबतीतही कोहली आघाडीवर आहे. IPL च्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर असून त्याने 267 सामन्यांत 8661 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा या यादीत दुसऱ्या स्थानावर असून त्याने आतापर्यंत 7046 धावा केल्या आहेत. तर MS धोनीने आपल्या IPL कारकिर्दीत 5439 धावा केल्या आहेत.

एकूणच, लोकप्रियता आणि अनुभव या बाबतीत तिघेही एकाच पातळीवर असले, तरी IPL 2026 मध्ये कमाईच्या बाबतीत विराट कोहलीने बाजी मारली आहे. मात्र, मैदानावर कोण बाजी मारणार, याकडेच आता सर्व क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news