IPL Dot Balls Record: IPL मधील अनोखा रेकॉर्ड; 31 बॉल, एकही रन नाही, कोण आहे हा फलंदाज?

IPL Dot Balls Record: IPL मध्ये शिखर धवनने एका डावात 31 डॉट बॉल खेळण्याचा अनोखा विक्रम केला आहे. सुरुवातीला संघर्ष करूनही त्याने त्याच डावात 99 धावांची शानदार खेळी केली.
IPL Dot Balls Record
IPL Dot Balls RecordPudhari
Published on
Updated on

IPL Dot Balls Record: IPL म्हणजे चौकार-षटकारांची आतषबाजी, वेगवान धावा आणि प्रेक्षकांचा जल्लोष. पण या धावांच्या खेळात कधी कधी असे काही रेकॉर्डही बनतात, जे ऐकून चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसतो. असाच एक अनोखा रेकॉर्ड म्हणजे एका डावात सर्वाधिक डॉट बॉल खेळण्याचा.

IPL 2026 चा नवा हंगाम 28 मार्चपासून सुरू होत असताना, अशा विचित्र आकडेवारीची पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे. कारण या हाय-स्कोरिंग लीगमध्येही काही वेळा फलंदाजांना सुरुवात करणे किती कठीण जाते, हे या रेकॉर्डवरून दिसतं.

एका सामन्यात सर्वाधिक डॉट बॉल खेळण्याचा विक्रम शिखर धवनच्या नावावर आहे. 2023 च्या हंगामात पंजाब किंग्सकडून खेळताना त्याने तब्बल 31 डॉट चेंडू खेळले होते. विशेष म्हणजे, या 31 चेंडूंवर त्याला एकही धाव करता आली नव्हती.

मात्र, ही आकडेवारी जितकी विचित्र वाटते, तितकीच त्याची पुढची कामगिरी थक्क करणारी होती. सुरुवातीला संघर्ष करणाऱ्या धवनने त्याच डावात जबरदस्त कमबॅक करत 66 चेंडूंमध्ये 99 धावांची खेळी केली होती. म्हणजेच, सुरुवातीचा स्लो स्टार्ट असूनही त्याच्याकडे सामना फिरवण्याची क्षमता होती.

IPL Dot Balls Record
IPL Hat Trick: 2 बॉलवर 3 विकेट्स! IPL मधील सर्वात धमाकेदार हॅटट्रिक कोणी केली होती? नंतर खेळाडूवर घातली बंदी

परदेशी खेळाडूंमध्ये या यादीत ड्वेन ब्राव्होचे नाव आघाडीवर आहे. त्याने एका सामन्यात 30 डॉट चेंडू खेळले होते. पण त्यानंतर त्याने जलद गतीने 70 धावा करत आपल्या संघाला सावरायचा प्रयत्न केला होता.

या यादीत इतर काही आक्रमक फलंदाजांचीही नावे आहेत, जे त्यांच्या स्फोटक खेळासाठी ओळखले जातात. आरोन फिंच आणि ड्वेन स्मिथ यांनी प्रत्येकी 29-29 डॉट चेंडू खेळले होते. तर जॉस बटलरने एका सामन्यात 28 डॉट चेंडू खेळले होते. यावरुन कळतं की T20 सारख्या फॉर्मॅटमध्येही मोठ्या खेळाडूंना कधी कधी लय सापडायला वेळ लागतो.

IPL Dot Balls Record
RCB IPL 2026: आरसीबी सलग 2-3 ट्रॉफी जिंकू शकते, विराट कोहलीचं कौतुक करत कोणी केली भविष्यवाणी?

जर संपूर्ण IPL करिअरमधील डॉट बॉल्सचा विचार केला, तर या यादीत अव्वल स्थानावर आहे विराट कोहली. त्याने IPL मध्ये तब्बल 2,152 डॉट चेंडू खेळले आहेत. त्याच्या मागोमाग रोहित शर्मा (2015), शिखर धवन (1977) आणि डेव्हिड वॉर्नर (1723) यांची नावं आहेत.

या आकडेवारीतून एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट होते की, T20 क्रिकेट म्हणजे फक्त सुरुवातीपासूनच फटकेबाजी करणं नव्हे. तर अनेकदा फलंदाज सुरुवातीला वेळ घेतात, परिस्थिती समजून घेतात आणि मगच आक्रमक होतात.

म्हणूनच डॉट बॉल्स असूनही हेच खेळाडू अनेकदा मॅच विनर ठरतात. क्रिकेटमध्ये आकडे कधी कधी फसवू शकतात, पण खेळाडूची खरी ताकद त्याच्या कमबॅकमध्ये आहे आणि हेच या रेकॉर्ड्समधून पुन्हा एकदा सिद्ध होतं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news