Sai Sudharsan Video: असं कोण आऊट होतं यार? साई सुदर्शनच्या विकेटने सर्वांनाच बसला धक्का; व्हिडिओ व्हायरल

Sai Sudharsan Hit Wicket: RCB विरुद्धच्या क्वालिफायर-1 सामन्यात साई सुदर्शनने शानदार चौकार मारला, पण त्याचवेळी बॅट स्टंप्सला लागल्याने तो ‘हिट विकेट’ बाद झाला.
Sai Sudharsan Hit Wicket Video Viral
Sai Sudharsan Hit Wicket Video ViralPudhari
Published on
Updated on

Sai Sudharsan Hit Wicket Video Viral: क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ का म्हटलं जातं, याचं आणखी एक भन्नाट उदाहरण IPL 2026 च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये पाहायला मिळालं. गुजरात टायटन्सचा स्टार फलंदाज साई सुदर्शन एका विचित्र पद्धतीने बाद झाला आणि त्याची विकेट पाहून चाहतेही अवाक झाले. चौकार मारल्यानंतर लगेचच त्याला पॅव्हेलियनमध्ये परतावं लागलं.

धर्मशालातील HPCA स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने प्रथम फलंदाजी करत गुजरातसमोर 255 धावांचं प्रचंड लक्ष्य ठेवलं होतं. अशा मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना गुजरातला दमदार सुरुवात आणि एका बाजूने डाव सावरणाऱ्या फलंदाजाची गरज होती. या हंगामात संघाचा सर्वात विश्वासार्ह फलंदाज ठरलेला साई सुदर्शन ही भूमिका निभावेल, अशी अपेक्षा होती.

सुरुवात दमदार, पण अचानक पलटी

सुदर्शनने सुरुवातही तुफान केली होती. तो फक्त 9 चेंडूत 14 धावा करून चांगल्या लयीत दिसत होता. काही उत्कृष्ट फटके खेळत त्याने RCB च्या गोलंदाजांवर दबाव टाकण्यास सुरुवात केली होती. मात्र, त्यानंतर मैदानावर असा प्रसंग घडला ज्याने सर्वांनाच धक्का बसला.

चौकार गेला... पण विकेटही गेली!

RCB चा गोलंदाज जेकब डफी याने शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू टाकला. सुदर्शनने बॅकफूटवर जात जबरदस्त स्क्वेअर ड्राइव्ह खेळला. चेंडू थेट सीमारेषेबाहेर चौकारासाठी गेला. सर्वांना वाटलं गुजरातला मोठा दिलासा मिळाला. पण शॉट खेळताना सुदर्शनच्या हातातून बॅट सुटली आणि मागे जाऊन थेट स्टंप्सवर आदळली आणि पंचांनी त्याला ‘हिट विकेट’ बाद घोषित केलं.

एकीकडे चौकार मिळाला, तर दुसरीकडे फलंदाजाला मैदान सोडावं लागलं. हा विचित्र प्रकार पाहून मैदानावरचे खेळाडू आणि चाहते दोघेही थक्क झाले.

Sai Sudharsan Hit Wicket Video Viral
IPL 2026: अर्शदीप सिंगने अचानक डिलीट केल्या 200 हून अधिक पोस्ट; विराट कोहलीचा व्हायरल व्हिडिओही हटवला, नेमकं काय घडलं?

IPL इतिहासात नकोसा विक्रम

या विकेटसह साई सुदर्शनच्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदवला गेला. तो IPL इतिहासात दोन वेळा ‘हिट विकेट’ होणारा पहिला फलंदाज ठरला.

Sai Sudharsan Hit Wicket Video Viral
Shreyas Iyer : श्रेयस अय्यरला दुहेरी झटका! टीम इंडियाच्या कर्णधारपदाचे स्वप्न भंगणार; शुभमन गिल मारणार बाजी?

गुजरातची फलंदाजी कोसळली

सुदर्शनच्या विकेटनंतर गुजरातचा डाव पूर्णपणे विस्कळीत झाला. कर्णधार शुभमन गिल अवघ्या 2 धावांवर बाद झाला. तर चांगली फटकेबाजी करणाऱ्या जॉस बटलरची 29 धावांची खेळी जॉश हेझलवूडने संपवली. पॉवरप्ले संपेपर्यंत गुजरातचे 5 विकेट्स फक्त 51 धावांवर पडल्या होत्या. त्यामुळे सामना RCB च्या बाजूने झुकल्याचं चित्र स्पष्ट दिसू लागलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news