IPL 2025 Final Venue

IPL 2025 Final Venue : आयपीएलचा अंतिम सामना अहमदाबादमध्ये रंगणार! प्लेऑफ सामन्यांच्या ठिकाणांमध्येही बदल

IPL 2025 चा अंतिम सामना 3 जून रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. मंगळवारी बीसीसीआयच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
Published on

ipl 2025 final at narendra modi stadium ahmedabad on june 3 playoff matches venue change

इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या अंतिम सामन्याबाबत (IPL Final 2025) एक मोठी अपडेट आली आहे. ताज्या वेळापत्रकानुसार, आयपीएलचा अंतिम सामना आता 3 जून रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. मंगळवारी (दि. 20) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) बैठकीत यावर निर्णय घेण्यात आला. अहमदाबाद मैदानावरच 1 जून रोजी क्वालिफायर 2 चेही आयोजन करण्यात येईल अशी माहिती समोर आली आहे.

बोर्डाने सांगितले की, क्वालिफायर-1 आणि एलिमिनेटर सामने पंजाबमधील मुल्लानपूर स्टेडियमवर खेळवले जातील. हे दोन्ही सामने 29 आणि 30 मे रोजी होतील. दुसरा क्वालिफायर सामना अहमदाबादमध्ये खेळला जाईल. खरं तर, देशातील अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने प्लेऑफ सामन्यांसाठी ही मैदाने निवडली आहेत. एवढेच नाही तर 23 मे रोजी बेंगळुरूमध्ये होणारा रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना पावसामुळे लखनऊला हलवण्यात आला आहे.

हैदराबाद संघ लखनौमध्ये राहणार

हैदराबाद संघ मंगळवारी बेंगळुरूला रवाना होणार होता, परंतु संघाने उड्डाण रद्द केले आहे. आता संघ आरसीबीविरुद्धच्या सामन्यापर्यंत लखनौमध्येच राहणार आहे. हवामान खात्याने बेंगळुरूमध्ये पावसासाठी येलो अलर्ट जारी केला आहे.

तीन संघ प्लेऑफमध्ये पोहोचले

आयपीएल 2025 च्या प्लेऑफमध्ये तीन संघांनी आपले स्थान निश्चित केले आहे. हे तीन संघ म्हणजे गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज. आता शेवटच्या स्थानासाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये लढत सुरू आहे. आता या दोन्ही संघांपैकी कोणता संघ अंतिम चारमध्ये पोहोचतो हे पाहणे बाकी आहे. आयपीएलच्या चालू हंगामात अजून 9 लीग सामने खेळवले जाणार आहेत. शेवटचा लीग सामना 27 मे रोजी खेळला जाईल आणि त्यानंतर प्लेऑफ सामने सुरू होतील.

IPL 2025 Final Venue
‘IPL’च्या पहिल्या षटकात सर्वाधिक धावा चोपणारे फलंदाज

वेळापत्रक

  • क्वाल‍िफायर 1 : 29 मे (मुल्लानपूर, न्यू चंदीगड)

  • एलिमिनेटर : 30 मे (मुल्लानपूर, न्यू चंदीगड)

  • क्वाल‍िफायर 2 : 1 जून (अहमदाबाद)

  • अंतिम सामना : 3 जून (नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद)

नरेंद्र मोदी स्टेडियमवरील आयपीएलची आकडेवारी

नरेंद्र मोदी स्टेडियमवर आतापर्यंत 40 आयपीएल सामने खेळले गेले आहेत. यामध्ये, धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाच्या विजयाची टक्केवारी जास्त आहे. पाठलाग करणाऱ्या संघाने 21 वेळा विजय मिळवला आहे. तर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 19 सामने जिंकले आहेत. या स्टेडियमवरील सर्वोच्च धावसंख्या 243 आहे, जी पंजाब किंग्जने 2025 च्या हंगामात गुजरात टायटन्सविरुद्ध केली. गुजरातनेही प्रत्युत्तरार 204 धावांपर्यंत मजल मारली होती.

IPL 2025 Final Venue
IPL प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्सने खेळला मोठा डाव! एकाच वेळी 3 खेळाडूंच्या रिप्लेसमेंटची घोषणा

फलंदाजांसाठी उपयुक्त खेळपट्टी

नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी उपयुक्त आहे. सुरुवातीला, वेगवान गोलंदाज नवीन चेंडूने घातक ठरू शकतात, परंतु चेंडू जसजसा जुना होत जातो तसतसे फलंदाज गोलंदाजांवर वर्चस्व गाजवू लागतात. आयपीएल 2025 मध्ये या मैदानावर 5 सामने खेळले गेले आहेत, ज्यातील 6 डावांमध्ये त्या-त्या संघांनी 200 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. चालू हंगामात, प्रथम फलंदाजी करणारा संघ पाचपैकी चार वेळा विजयी झाला आहे.

IPL 2025 Final Venue
Digvesh rathi | चुकीला माफी नाही! दिग्वेश राठीवर कडक कारवाई, अभिषेक शर्माचे काय झाले?

आयपीएल अंतिम सामन्याची आकडेवारी

नरेंद्र मोदी स्टेडियमवर आतापर्यंत दोनदा आयपीएलचा अंतिम सामना खेळवण्यात आला आहे. आयपीएल 2022 चा अंतिम सामना गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात याच मैदानावर खेळवण्यात आला. त्या सामन्यात गुजरातने 7 विकेट्सने विजय मिळवून इतिहास रचला. पुढच्या वर्षी म्हणजेच आयपीएल 2023 चा अंतिम सामनाही नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला. त्यावेळी, चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा 5 विकेट्सने पराभव केला आणि पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद जिंकले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news