‘IPL’च्या पहिल्या षटकात सर्वाधिक धावा चोपणारे फलंदाज

रणजित गायकवाड

यशस्वीने चोपल्या 22 धावा

यशस्वी जैस्वालने 18मेच्या सामन्यात पंजाब किंग्ज विरुद्ध खेळताना अर्शदीप सिंगच्या पहिल्या षटकात 22 धावा चोपल्या.

जाणून घेऊया

अशा फलंदजांबद्दल जाणून घेऊया ज्यांनी IPL सामन्याच्या पहिल्या षटकात सर्वाधिक धावा फटकावल्या आहेत.

यशस्वी जैस्वालच्या 26 धावा

या यादीत यशस्वी जैस्वाल आघाडीवर आहे. त्याने 2023 च्या हंगामात KKR विरुद्ध खेळताना पहिल्याच षटकात 26 धावा चोपल्या होत्या.

पृथ्वी शॉ 24 धावा

दुस-या क्रमांकावर पृथ्वी शॉ आहे. त्याने 2021 च्या हंगामात KKRच्या शिवम मावीच्या पहिल्या षटकात सलग 6 चौकार फटकावून 24 धावा कुटल्या होत्या.

यशस्वी जैस्वालच्या 22 धावा

तिस-या स्थानी जैस्वालच आहे. 2025 च्या IPLमध्ये त्याची बॅट पुन्हा तळपली. त्याने पंजाबच्या अर्शदीपच्या पहिल्या षटकात 22 धावा फटकावल्या. यादरम्यान त्याने 4 चौकार 1 षटकार लगावला.

सुनिल नारायण

2021 च्या हंगमात राजस्थान रॉयल्स विरुद्ध खेळताना KKRच्या सुनिल नारायणने डावाच्या पहिल्याच षटकात 21 धावा काढल्या होत्या.

नमन ओझा

IPLच्या सुरुवातीला नमन ओझाची बॅट चांगलीच तळपली होती. त्याने 2009 मध्ये KKR विरुद्ध खेळताना पहिल्या षटकात 21 धावा काढल्या होत्या.

यशस्वी जैस्वाल 20 धावा

जैस्वालने 2023 च्या IPL हंगामात दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध खेळताना 20 धावा काढल्या होत्या.

गेल वादळ

यादीत ख्रिस गेलचेही नाव आहे. त्याने 2011 च्या हंगामात मुंबई इंडियन्सला घाम फोडला होता. गेलने पहिल्याच षटकात 20 धावा चोपल्या.

ख्रिस गेलची 2014मध्ये पुनरावृत्ती

गेलने 2014 च्या हंगामात RCB कडून खेळताना पंजाबविरुद्ध पहिल्याच षटकात 20 केल्या होत्या.

ॲडम गिलख्रिस्ट

2009 च्या IPL हंगामात डेक्कन चार्जसचा कर्णधार असणा-या गिलख्रिस्टने दिल्लीच्या गोलंदाजाची धुलाई केली. त्याने पहिल्याच षटकात 20 धावा फटकावल्या.