IPL 2025 Blow For Gujarat Titans : ‘गुजरात टायटन्स’ला मोठा झटका, बटलर गाशा गुंडाळून मायदेशी परतला; बदली खेळाडूची घोषणा

गुजरात टायटन्स संघाने IPL 2025 च्या प्लेऑफमध्ये आपले स्थान अद्याप निश्चित केलेले नसले तरी, भविष्यातील परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी जोस बटलरच्या जागी बदली खेळाडूचे नाव जाहीर केले आहे.
IPL 2025 Gujarat Titans Jos Buttler Kusal Mendis
Published on
Updated on

IPL 2025 Gujarat Titans Jos Buttler Not Return to India Kusal Mendis replace

अहमदाबाद : भारत आणि पाकिस्तानमधील सीमेवरील वाढत्या तणावामुळे स्थगित करण्यात आलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या हंगामातील उर्वरित सामने 17 मे पासून सुरू होतील. दरम्यान, नवीन वेळापत्रकामुळे प्लेऑफ सामने सुरू होण्यापूर्वी अनेक विदेशी खेळाडू मायदेशी परतले आहेत. त्यापैकी एक जोस बटलर आहे, ज्याने गुजरात टायटन्ससाठी या हंगामात उत्कृष्ट कामगिरी केली.

खरंतर, इंग्लंड संघाला वेस्ट इंडिजविरुद्ध घरच्या मैदानावर मर्यादित षटकांची मालिका खेळायची आहे, ज्यामध्ये बटलरला भाग घेण्यासाठी परत जावे लागेल. ही परिस्थिती लक्षात घेता, गुजरात टायटन्सने प्लेऑफ सामन्यांसाठी बटलरच्या जागी कुसल मेंडिसचा बदली खेळाडू म्हणून समावेश केला आहे.

IPL 2025 Gujarat Titans Jos Buttler Kusal Mendis
IPL 2025 : 'बीसीसीआय'ने केला विदेशी खेळाडूंच्‍या नियमात बदल, जाणून घ्‍या सविस्‍तर

मेंडिस पीएसएलमध्ये पुन्हा खेळणार नाही

श्रीलंकेचा स्फोटक यष्टीरक्षक-फलंदाज कुसल मेंडिस गेल्या आठवड्यापर्यंत पाकिस्तान सुपर लीगमध्ये क्वेटा ग्लॅडिएटर्सकडून खेळत होता. ज्यामध्ये त्याने 7 मे रोजी त्याचा शेवटचा सामना खेळला. दरम्यान, ईएसपीएन क्रिकइन्फोनुसार, सुरक्षेच्या कारणास्तव मेंडिस आता उर्वरित पीएसएल सामन्यांमध्ये खेळण्यासाठी परतणार नाही. आता त्याला आयपीएलमध्ये चांगली संधी मिळाली आहे, ज्यामध्ये तो बऱ्याच काळापासून खेळू इच्छित होता.

IPL 2025 Gujarat Titans Jos Buttler Kusal Mendis
Rohit Sharma ODi Retirement : ...तर त्या दिवशी वन डेमधूनही पायउतार होईन! भविष्यातील वाटचालीबद्दल रोहित शर्माचे वक्तव्य

गुजरात टायटन्स संघाने अद्याप अधिकृतपणे प्लेऑफसाठी आपले स्थान निश्चित केलेले नाही. तरी, ते सध्या 11 सामन्यांत 8 विजयांसह पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहेत. त्यांनी एक जरी सामना जिंकला तरी त्यांचे प्लेऑफसाठीचे स्थान पूर्णपणे निश्चित होईल. गुजरातला अजूनही लीग टप्प्यात तीन सामने खेळायचे आहेत, ज्यामध्ये त्यांचा पुढील सामना 18 मे रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध असेल.

IPL 2025 Gujarat Titans Jos Buttler Kusal Mendis
Neeraj Chopra Indian Army : ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राला ‘लेफ्टनंट कर्नल’पदी बढती!

मेंडिसची टी-20 कारकीर्द

श्रीलंकेच्या कुसल मेंडिसने आतापर्यंत 172 टी-20 सामने खेळले आहेत. ज्यात त्याने 30.24 च्या सरासरीने 4718 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 2 शतके आणि 32 अर्धशतके झळकली आहेत. शिवाय, टी-20 मध्ये मेंडिसचा स्ट्राइक रेट 137.43 आहे. अशा परिस्थितीत, बटलरच्या जागी यष्टीरक्षक फलंदाज म्हणून मेंडिस हा गुजरातसाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.

IPL 2025 Gujarat Titans Jos Buttler Kusal Mendis
IND vs ENG Test Series : इंग्लंडच्या मैदानांवर फक्त 3 भारतीयांनाच करता आला ‘हा’ महान पराक्रम! यावेळी कोण इतिहास रचणार?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news