

Neal Mohan TIME CEO of the Year 2025: यूट्यूबचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) नील मोहन यांना टाइम मॅगझिनने 2025 साठी ‘सीईओ ऑफ द ईयर’ म्हणून गौरवले आहे. जगभरातील अब्जावधी लोकांचे लक्ष वेधाणाऱ्या आणि मनोरंजनाची दिशा बदलणाऱ्या यूट्यूब प्लॅटफॉर्मचे कॅप्टन म्हणून त्यांना ओळखले जाते.
टाइमने लिहिले की, “या जगातील सर्वाधिक ‘मन भटकवणाऱ्या मशीन’चा पायलट म्हणजे नील मोहन.” त्यांचा शांत स्वभाव आणि लोकांना जोडून ठेवण्याच्या वृत्तीमुळे ते जगातील सर्वात प्रभावशाली टेक लिडरमध्ये गणले जातात.
नील मोहन यांचा जन्म अमेरिकेतील इंडियाना येथे झाला. त्यांचे पालक भारतीय असून त्यांचे बालपण फ्लोरिडा येथे गेले. किशोरवयात ते आपल्या वडिलांसोबत काही काळासाठी लखनऊला राहिले होते. येथूनच त्यांचा भारताशी भावनिक संबंध अधिक दृढ झाला.
1996 मध्ये स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पूर्ण केले
2005 मध्ये स्टॅनफर्डमधून एमबीए केले
करिअरची सुरुवात ऍक्सेन्चरमध्ये वरिष्ठ विश्लेषक म्हणून केली
त्यानंतर Microsoft व DoubleClick मध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली
2008 मध्ये Google मध्ये कामाला सुरुवात, तेव्हा Google ने DoubleClick विकत घेतले होते
Google मध्ये त्यांनी डिस्प्ले आणि व्हिडिओ अॅड्सचे Senior Vice President म्हणून जागतिक जाहिरातीची इकोसिस्टम तयार करण्यात महत्वाची भूमिका बजावली.
2021 मध्ये, यूट्यूबचे चीफ प्रॉडक्ट ऑफिसर असताना नील मोहन यांनी YouTube Shorts हे फॉरमॅट लॉन्च केले, TikTok ला टक्कर देणारा आणि आज जगभरातील क्रिएटर्सचा आवडता व्हिडिओ फॉरमॅट.
त्यांना प्रेरणा मिळाली यूट्यूबवर अपलोड झालेल्या पहिल्यावहिल्या व्हिडिओमधून “Me at the Zoo” 18 सेकंदांच्या या व्हिडिओमुळे यूट्यूब शॉर्ट्सचा जन्म झाला.
नील म्हणाले होते “आज मोबाईलमध्ये कॅमेरा, एडिटिंगची ताकद आणि कंटेंट क्रिएशनची क्षमता आहे. यूट्यूब शॉर्ट्स म्हणजे त्या क्षमतेचा जागतिक विस्तार आहे.”
2023 मध्ये यूट्यूबच्या पूर्वीच्या CEO Susan Wojcicki यांनी राजीनामा दिल्यानंतर नील मोहन यांनी पदभार स्वीकारला. भारतातील यूट्यूबच्या प्रचंड वाढीकडे ते विशेष लक्ष देत आहेत आणि भारतीय क्रिएटर्स, प्रादेशिक कंटेंट आणि डिजिटल इकॉनॉमीसाठी आणि मोठ्या इन्व्हेस्टमेंट्साठी काम करत आहेत.