Paris 2024 Olympics hockey | सेमीफायनलपूर्वी भारतीय हॉकी संघाला धक्का, 'या' खेळाडूवर एका सामन्यासाठी बंदी

हॉकीच्या सेमीफायनलमध्ये 'हा' खेळाडू खेळणार नाही
Paris 2024 Olympics hockey
पॅरिस ऑलिम्पिक हॉकी स्पर्धेत भारतीय खेळाडू अमित रोहिदास याच्यावर एका सामन्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.file photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

पॅरिस २०२४ ऑलिम्पिक हॉकी स्पर्धेत (Paris 2024 Olympics hockey) भारतीय हॉकी संघातील खेळाडू अमित रोहिदास (Indian hockey team player Amit Rohidas) याच्यावर एका सामन्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. यामुळे मंगळवारी जर्मनी विरुद्ध होणाऱ्या भारताच्या महत्त्वपूर्ण उपांत्य फेरीच्या सामन्याला त्याला मुकावे लागणार आहे.

Paris 2024 Olympics hockey
Olympics 2024 : ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघासोबत अन्याय? जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण

भारतीय हॉकी संघ पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. भारतीय संघाचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना रविवारी (दि. ४) ग्रेट ब्रिटन विरुद्ध झाला. ज्यात भारतीय संघाने शूटआऊटमध्ये ४-२ असा विजय मिळवला. पण रविवारी झालेल्या ग्रेट ब्रिटन विरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अमित रोहिदास याला रेड कार्ड दाखविण्यात आले. त्यामुळे तो सामन्याच्या १७व्या मिनिटांपासून बाहेर राहिला. यानंतर भारतीय संघ केवळ १० खेळाडूंसह ४३ मिनिटे खेळत राहिला. अमितला रेड कार्ड देण्यावरुन वाद झाला होता.

रेड कार्डमुळे आपोआप एका सामन्याची बंदी लागू होते. ज्यामुळे खेळाडूला स्पर्धेतील पुढील सामना खेळता येत नाही. त्याला बाहेर रहावे लागेत. "अमित रोहिदासला ४ ऑगस्ट रोजी भारत विरुद्ध ग्रेट ब्रिटन सामन्यादरम्यान आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या (FIH) आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आले होते," असे FIH ने अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

या निलंबनाच्या कारवाईमुळे भारताच्या जर्मनी विरुद्धचा उपांत्य फेरीच्या सामन्यात अमित रोहिदासचा सहभाग नसेल आणि भारतीय संघात केवळ १५ खेळाडू असतील.

Paris 2024 Olympics hockey
टीम इंडियाची 'भिंत' ठरलेल्‍या श्रीजेशच्‍या हॉकी स्‍टिकवर कोणाचे नाव?

ग्रेट ब्रिटन विरुद्धच्या सामन्यात नेमकं काय झालं होतं?

ग्रेट ब्रिटन विरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या क्वार्टरमध्ये रोहिदास ब्रिटनचा फॉरवर्ड विल कॅलननशी भिडला. मिडफिल्डमध्ये त्याच्यापासून बचाव करण्याचा प्रयत्न करत असताना रोहिदासच्या स्टिकचा अनवधानाने कॅलननच्या चेहऱ्याला स्पर्श झाला. यामुळे त्याला रेड कार्ड दाखवण्यात आले. पण मैदानावरील रेफ्रीने सुरुवातीला या प्रकाराला गंभीर उल्लंघन मानले नाही. दरम्यान, व्हिडिओ रेफरल केल्यावर निर्णय रद्द करण्यात आला आणि रोहिदासला रेड कार्ड देण्यात आले.

Paris 2024 Olympics hockey
Paris Olympics : भारतीय हॉकी संघाची उपांत्य फेरीत मुसंडी! ब्रिटनचा रडीचा डाव हाणून पाडला

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news