Olympics 2024 Hocky India
ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघासोबत अन्यायPudhari Photo

Olympics 2024 : ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघासोबत अन्याय? जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण

उपांत्यपूर्व सामन्यात भारतीय हॉकी संघावर अन्याय झाल्याची तक्रार भारतीय हॉकीने केली आहे
Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. भारतीय संघाचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना रविवारी (दि.4) ग्रेट ब्रिटन विरुद्ध खेळला गेला. ज्यामध्ये भारतीय संघाने शूटआऊटमध्ये 4-2 असा विजय मिळवला. हा सामना अनेक प्रकरणांमुळे वादात सापडला आहे. याबाबत भारतीय हॉकीकडून अधिकृतपणे तक्रार दाखल करण्यात आली आहे. हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चांगला खेळ करत आहे. रविवारी झालेला सामना अत्यंत रोमांचकारी झाला. सामना 1-1 असा बरोबरीत सुटल्यानंतर भारतीय संघाने शूटआउट 4-2 ने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

अमित रोहिदासला सामन्यात रेड कार्ड

हा सामना अनेक प्रकरणांमुळे वादात सापडला आहे. यातील पहिली गोष्ट म्हणजे, अमित रोहिदासला सामन्यात रेड कार्ड देण्यात आले. त्यामुळे तो सामन्याच्या 17व्या मिनिटापासून बाहेरच होता. यानंतर भारतीय संघ केवळ 10 खेळाडूंसह 43 मिनिटे खेळत राहिला. अमितला रेड कार्ड देणे हा सामन्याचा मोठा वाद होता.

Olympics 2024 Hocky India
Paris Olympics : भारतीय हॉकी संघाची उपांत्य फेरीत मुसंडी! ब्रिटनचा रडीचा डाव हाणून पाडला

भारतीय हॉकीने तक्रारीत मांडलेले मुद्दे

  • व्हिडिओ रिव्ह्यू अंपायरने वारंवार केले. विशेषत: एका भारतीय खेळाडूबाबत जेथे रेड कार्ड दाखविण्यात आले. ज्यामुळे व्हिडिओ रिव्ह्यू सिस्टमवरील आत्मविश्वास कमी झाला आहे.

  • शूट-आऊट दरम्यान गोल पोस्टच्या मागून प्रशिक्षक मार्गदर्शन करत होता.

  • शूट-आउट दरम्यान गोलकीपरने व्हिडिओ टॅब्लेट वापर केला.

  • अमितला दुसऱ्या क्वार्टरमध्ये रेड कार्ड मिळाले

Olympics 2024 Hocky India
टीम इंडियाची 'भिंत' ठरलेल्‍या श्रीजेशच्‍या हॉकी स्‍टिकवर कोणाचे नाव?

सामन्याचा दुसरा क्वार्टर वादांनी भरलेला होता. भारतीय खेळाडू अमित रोहिदासला खेळाच्या 17व्या मिनिटाला लाल कार्ड मिळाले. भारतीय संघ उर्वरित 43 मिनिटे 10 खेळाडूंसह खेळला. अमितची हॉकीस्टीक विल कॅलनच्या चेहऱ्यावर लागली. अशा स्थितीत अमितने हे जाणूनबुजून केले असल्याचा जर्मन व्हिडिओ अंपायरचा विश्वास होता. अशा स्थितीत व्हिडीओ अंपायरच्या सल्ल्यानुसार मैदानावरील पंचांनी अमितला रेड कार्ड दाखवले. हे जाणूनबुजून झाले नसल्याचा भारतीय खेळाडूंचा समज होता. व्हिडिओ अंपायरने पिवळे कार्ड दिले असते तर ते अधिक योग्य ठरले असते.

Olympics 2024 Hocky India
टीम इंडियाची 'भिंत' ठरलेल्‍या श्रीजेशच्‍या हॉकी स्‍टिकवर कोणाचे नाव?

लाल कार्डानंतरही भारतीय हॉकी संघाने दमदार पुनरागमन केले. कर्णधार हरमनप्रीत सिंगने खेळाच्या २२व्या मिनिटाला गोल करून भारताला ग्रेट ब्रिटनविरुद्ध १-० अशी आघाडी मिळवून दिली. तथापि, 27 व्या मिनिटाला ली मॉर्टनने गोल केल्याने ग्रेट ब्रिटनने लवकरच बरोबरी साधली. यानंतर उर्वरित दोन क्वार्टरमध्ये एकही गोल झाला नाही आणि सामना शूटआऊटमध्ये गेला. या सामन्यात श्रीजेशने अनेक सेव्ह केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news