IND vs SL 2nd Test Day 1: फलंदाजी करताना ऋषभ पंत मैदानातून बाहेर, नेमकं काय घडलं?

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत गिल-पडिक्कलची अर्धशतके
IND vs SL 2nd Test Day 1
भारतीय डावाच्या ५८ व्या षटकात ऋषभ पंतला मैदान सोडावे लागल्‍याने टीम इंडियाला धक्‍का बसला. Pudhari
Published on
Updated on

IND vs SL 2nd Test Day 1: कर्णधार शुभमन गिल (५०) आणि देवदत्त पडिक्कल (नाबाद ६३) यांच्या जबाबदार अर्धशतकांच्या जोरावर भारताने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत चहापानापर्यंत ३ बाद १८७ अशी भक्कम मजल मारली. पहिल्या सत्रात के. एल. राहुल आणि यशस्वी जयस्वाल लवकर बाद झाल्यानंतर, गिल आणि पडिक्कल यांनी तिसऱ्या विकेटसाठी १२० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचून भारताचा डाव सावरला. मात्र भारतीय डावाच्या ५८ व्या षटकात ऋषभ पंतला मैदान सोडावे लागल्‍याने टीम इंडियाला धक्‍का बसला आहे.

नेमकं काय घडलं?

भारतीय डावाच्या ५८ व्या षटकात लहिरू कुमाराच्या गोलंदाजीसाठी आला. कुमाराच्या बाउन्सरवर पंतने 'पुल' शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू थेट त्याच्या मनगटाला (ग्लव्ह्जवर) जाऊन लागला. चेंडू लागताच पंत तीव्र वेदनेने विव्हळताना दिसला. फिजिओने मैदानावर येऊन सूज कमी करण्यासाठी त्याच्या मनगटावर आईस पॅक लावला. मात्र, प्रदीर्घ उपचारानंतरही वेदना कमी न झाल्याने पंतला 'रिटायर्ड हर्ट' होऊन मैदान सोडावे लागले. त्याच्या जागी रवींद्र जडेजा फलंदाजीला आला.

IND vs SL 2nd Test Day 1
Vaibhav Sooryavanshi : दुलीप ट्रॉफीमध्ये वैभव सूर्यवंशीची निराशाजनक सुरुवात; अवघ्या ६ चेंडूंत तंबूत परतला

गिल-पडिक्कलची अर्धशतके

चहापानापूर्वी पडिक्कलला साथ देण्यासाठी ऋषभ पंत मैदानावर आला होता. पडिक्कलच्या डावाची सुरुवात काहीशी चाचपडत झाली; तो १ धावेवर असताना त्याला जीवदानही मिळाले. फिरकीपटू केशरा नुवान्थाच्या गोलंदाजीवर बॅकवर्ड पॉईंटला श्रीलंका कर्णधार धनंजया डी सिल्व्हाने त्याचा सोपा झेल सोडला.या जीवदानाचा पूर्ण फायदा उठवत पहिल्या कसोटीत १६७ धावा ठोकणाऱ्या पडिक्कलने शानदार फटकेबाजी केली. लहिरू कुमाराच्या गोलंदाजीवर मारलेला उत्तुंग 'पुल' शॉट मारत त्याने ९० चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले.

IND vs SL 2nd Test Day 1
WTC points table 2026 : ऑस्ट्रेलियाकडून बांगलादेशचा 'धुव्वा'! WTC गुणतालिकेत भारताला सुवर्णसंधी

पहिल्‍या दिवशी भारत भक्‍कम स्‍थितीत

गिलनेही पडिक्कललाला तितकीच भक्कम साथ दिली. प्रभात जयसूर्याला मारलेला त्याचा शॉर्ट-आर्म पुल प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरला. मात्र, अर्धशतक पूर्ण केल्यानंतर चहापानाच्या काही वेळ आधी असिथा फर्नांडोच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक डिकवेलाकडे झेल देऊन गिल बाद झाला. कर्णधार शुभमन गिल (५०) आणि देवदत्त पडिक्कल (नाबाद ६३) यांच्या जबाबदार अर्धशतकांच्या जोरावर भारताने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत चहापानापर्यंत ३ बाद १८७ अशी भक्कम मजल मारली.

IND vs SL 2nd Test Day 1
US Envoy in Kashmir | जम्मू आणि काश्मीर भारताचा महत्त्वाचा भाग : अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांचे श्रीनगरमध्ये मोठे विधान

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news