IND vs ENG Test Series Timing : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील सामने किती वाजता सुरू होतील? जाणून घ्या वेळ

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व शुभमन गिलकडे सोपवण्यात आले आहे, तर ऋषभ पंत उपकर्णधार असेल. या मालिकेतील सामन्यांची वेळे जाणून घेऊया.
india vs england test match time
Published on
Updated on

india vs england test series match timing

भारतीय कसोटी संघाने इंग्लंड दौऱ्याची तयारी सुरू केली आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक आधीच जाहीर करण्यात आले होते. दरम्यान, बीसीसीआयने मागच्या आठवड्यात टीम इंडियाची घोषणाही केली. शुभमन गिलला नवीन कसोटी कर्णधार बनवण्यात आले आहे, तर ऋषभ पंतकडे उपकर्णधाराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मालिकेला आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. उभय संघांमधील सामने किती वाजता सुरू होणार याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. चला तर आतापासून सामन्याची वेळ नोंदवून ठेवा.

मालिकेतील पहिला सामना 20 जूनपासून सुरू

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका 20 जूनपासून सुरू होणार आहे. त्याआधी दोन-चार दिवसांचे सामनेही खेळले जातील. परंतु या चार दिवसांच्या सामन्यात बरेच खेळाडू खेळताना दिसणार नाहीत. त्यामुळे संपूर्ण लक्ष पाच सामन्यांच्या मालिकेवर असेल. मालिकेतील पहिला सामना लीड्स येथील हेडिंग्ले मैदानावर खेळला जाईल.

india vs england test match time
MS Dhoni : पुढील 'IPL' खेळणार का? निवृत्तीच्‍या प्रश्‍नावर धोनीची पुन्‍हा 'गुगली'! म्‍हणाला...

भारतात हा सामना दुपारी 3:30 वाजता सुरू होईल. याच्या अर्धा तास आधी टॉस होईल. पहिल्या दिवशी टॉस होणार असला तरी उर्वरित चार दिवस सामना थेट दुपारी 3.30 वाजता सुरू होईल. जर पाऊस पडला नाही तर हीच वेळ असेल. पण जर पाऊस पडला आणि सामन्यात व्यत्यय आला तर षटके पूर्ण करण्यासाठी सामना लवकर सुरू करण्यात येईल.

पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना 31 जुलैपासून सुरू होईल आणि 4 ऑगस्टपर्यंत चालेल. म्हणजेच ही मालिका ऑगस्टपर्यंत खेळली जाणार आहे. सर्व सामने एकाच वेळी सुरू होतील, यात कोणताही फरक नाही. जर दिवसभर सामना सुरळीत चालला तर दिवसाचा खेळ रात्री 10:30 ते 11:00 च्या सुमारास संपेल. ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC) तिसऱ्या चक्रातील पहिलीच मालिका असून दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे.

india vs england test match time
IPL 2025 Qualifier 1 : आरसीबीच्या पराभवासाठी गुजरात करणार प्रार्थना! क्वालिफायर-1 साठी अशी आहेत समीकरणे

हे सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार (IST) दुपारी 3:30 वाजता सुरू होतील. इंग्लंडमधील स्थानिक वेळ (BST) आणि भारतातील वेळ यामध्ये साधारणपणे साडेचार तासांचा फरक आहे. सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग ‘जिओहॉटस्टार’वर (JioHotstar) असेल. तर स्टार स्पोर्ट्स (Star Sports) वाहिनीवर सामन्यांचे थेट प्रक्षेपण होणार आहे.

गिल आणि टीम इंडियाला आव्हानात्मक

भारतीय संघासाठी आणि विशेषतः शुभमन गिलसाठी हे सोपे आव्हान असणार नाही. गिलने काही टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले असले तरी तो कसोटी सामन्यांमध्ये पहिल्यांदाच नेतृत्व करताना दिसेल.

india vs england test match time
Karun Nair Inspiring Comeback : दिल ये ज़िद्दी है..! करुण नायरची रणधुमाळी, धैर्य-मेहनत आणि जिद्दीने केलेले कमबॅक

रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय फलंदाजी तितकी मजबूत दिसत नाहीय. अशा परिस्थितीत भारतीय संघ इंग्लंडच्या खेळपट्ट्यांवर कशी कामगिरी करतो हे पहावे लागेल. संघ युवा आहे आणि इंग्लंडचा संघ घरच्या मैदानावर आणखी धोकादायक बनतो. अशा परिस्थितीत, सामने खूप मनोरंजक होण्याची शक्यता आहे.

इंग्लंड मालिकेसाठी टीम इंडिया :

शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव.

india vs england test match time
Shubman Gill: बुमराह, पंतसारख्या दिग्गज खेळाडूंना मागे टाकत 25 वर्षांचा गिल कर्णधारपदापर्यंत कसा पोहोचला?

इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिका वेळापत्रक (भारतीय प्रमाणवेळेनुसार)

पहिला कसोटी सामना

स्थळ : हेडिंग्ले, लीड्स

तारीख : 20 जून ते 24 जून 2025

वेळ: दुपारी 3:30 वाजता

दुसरा कसोटी सामना

स्थळ : एजबेस्टन, बर्मिंगहम

तारीख : 2 जुलै ते 6 जुलै 2025

वेळ : दुपारी 3:30 वाजता

तिसरा कसोटी सामना

स्थळ : लॉर्ड्स, लंडन

तारीख : 10 जुलै ते 14 जुलै 2025

वेळ : दुपारी 3:30 वाजता

चौथा कसोटी सामना

स्थळ : ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर

तारीख : 23 जुलै ते 27 जुलै 2025

वेळ : दुपारी 3:30 वाजता

पाचवा कसोटी सामना

स्थळ : द ओव्हल, लंडन

तारीख : 31 जुलै ते 4 ऑगस्ट 2025

वेळ : दुपारी 3:30 वाजता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news