IPL 2025 Qualifier 1 : आरसीबीच्या पराभवासाठी गुजरात करणार प्रार्थना! क्वालिफायर-1 साठी अशी आहेत समीकरणे

पंजाब, RCB यांनी अखेरचे साखळी सामने जिंकले, तर ते 19 गुणांवर पोहोचतील आणि पहिले 2 स्थान काबीज करतील. तसे झाले तर GT तिसर्‍या आणि Mi चौथ्या क्रमांकावर राहील.
IPL 2025 RCB GT
Published on
Updated on

Gujarat Titans pray for RCB's defeat know about equations for Qualifier 1

आयपीएल 2025 स्पर्धेत गुजरात टायटन्स, पंजाब किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि मुंबई इंडियन्स या संघांनी प्लेऑफमध्ये यापूर्वीच स्थान पक्के केले आहे, पण चारही संघांत पहिल्या दोन स्थानांमध्ये जागा मिळवण्यासाठी चुरस आहे. आता या पराभवानंतरही गुजरात अव्वल क्रमांकावर असले, तरी त्यांचे सर्व साखळी सामने संपले आहेत.

त्यामुळे आता त्यांना पहिल्या दोन स्थानांमध्ये कायम राहायचे असेल, तर पंजाब किंग्ज, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या अखेरच्या साखळी सामन्यांवर अवलंबून राहावे लागणार आहे. त्यातही बेंगळुरूच्या निकालावर आता गुजरातला सर्वाधिक अवलंबून राहावे लागेल.

IPL 2025 RCB GT
Karun Nair Inspiring Comeback : दिल ये ज़िद्दी है..! करुण नायरची रणधुमाळी, धैर्य-मेहनत आणि जिद्दीने केलेले कमबॅक

पंजाब किंग्जचा अखेरचा सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध सोमवारी (दि. 26) होणार आहे. तसेच बेंगळुरूचा शेवटचा सामना मंगळवारी (दि. 27) लखनौ सुपर जायंटस्विरुद्ध खेळवला जाणार आहे.

आता जर पंजाब आणि बेंगळुरू यांनी अखेरचे साखळी सामने जिंकले, तर ते 19 गुणांवर पोहोचतील आणि पहिले दोन स्थान काबीज करतील. तसे झाले तर गुजरात तिसर्‍या आणि मुंबई चौथ्या क्रमांकावर राहील.

IPL 2025 RCB GT
IPL 2025 : टेबल टॉपर ‘टायटन्स’चे तळातल्या CSK पुढे लोटांगण! ‘गुजरात’चा घरच्या मैदानावर 83 धावांनी दारुण पराभव

पण जर मुंबईने पंजाबला पराभूत केले, तरी गुजरातला ही आशा करावी लागेल की बेंगळुरूने लखनौविरुद्ध पराभूत व्हावे, तरच गुजरात पहिल्या दोनमध्ये कायम राहील. असे झाले तर मुंबईचे 18 गुण होतील तसेच त्यांचा नेट रनरेट गुजरातपेक्षा चांगला असल्याने ते अव्वल क्रमांकावर जातील आणि गुजरात दुसर्‍या क्रमांकावर राहील.

मात्र जर पंजाबच्या पराभवानंतरही बेंगळुरूने विजय मिळवला, तर गुजरात तिसर्‍या क्रमांकावर घसरेल आणि बेंगळुरू 19 गुणांसह व मुंबई 18 गुणांसह पहिल्या दोन क्रमांकावर असतील. तसेच जर पंजाबने मुंबईला पराभूत केले, तर गुजरातला आशा करावी लागेल की बेंगळुरूने पराभूत व्हावे. जेणेकरून ते दुसर्‍या क्रमांकावर राहतील.

IPL 2025 RCB GT
India Test Squad for England Tour | कसोटी कर्णधारपदाच्या शर्यतीत बुमराह मागे का पडला?

म्हणजेच काहीही करून बेंगळुरू संघ अखेरचा साखळी सामना पराभूत व्हावा, अशीच इच्छा गुजरातची असेल. कारण पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याचा निकाल काहीही लागला, तरी जर बेंगळुरूने लखनौला पराभूत केले, तर मात्र गुजरातला क्वालिफायर-1 सामना खेळता येणार नाही.

IPL 2025 RCB GT
Shubman Gill: बुमराह, पंतसारख्या दिग्गज खेळाडूंना मागे टाकत 25 वर्षांचा गिल कर्णधारपदापर्यंत कसा पोहोचला?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news