IND vs ENG 3rd Test : कॅप्‍टन शुभमन इंग्‍लंडच्‍या 'ओपनर'वर भडकला, लॉर्डसवर नेमकं काय घडलं? (Viral video)

तिसर्‍या दिवसाचा खेळ संपताच गिल इंग्‍लंडच्‍या फलंदाजांशी भिडला
IND vs ENG 3rd Test :
भारत आणि इंग्लंड यांच्यातील लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवसाचा खेळ संपत असताना भारतीय कर्णधार शुभमन गिल (Shubman Gill) इंग्‍लंडच्‍या सलामीवीर जॅक क्रॉलीशी भिडला. (Image source- X)
Published on
Updated on

India vs England 3rd Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवसाचा खेळ संपत असताना भारतीय कर्णधार शुभमन गिल (Shubman Gill) इंग्‍लंडच्‍या सलामीवीरांशी (ओपनर) भिडला. दिवसाच्या शेवटच्या षटकात गिल आणि इंग्लंडचे सलामीवीर जॅक क्रॉली व बेन डकेट यांच्यात शाब्दिक चकमक झाली.

मैदानावर नेमकं काय घडलं?

भारताचा पहिला डाव ३८७ धावांवर संपुष्‍टात आला. दिवसाच्या खेळाची काही मिनिटेच शिल्लक होती. अशा स्थितीत इंग्लंडचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. उर्वरित वेळेत जास्तीत जास्त दोन षटकेच टाकली जाऊ शकत होती. भारताकडून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पहिले षटक टाकले. बुमराहच्या भेदक गोलंदाजीसमोर जॅक क्रॉली आणि बेन डकेट अस्वस्थ दिसत होते. आणखी एक षटक खेळण्याची इच्छा नसल्याने इंग्लिश फलंदाजांनी वेळकाढूपणा करण्यास सुरुवात केली.

IND vs ENG 3rd Test :
IND vs ENG 3rd Test | बुमराहचा हल्लाबोल, तरीही इंग्लंड 387!

जॅक क्रॉलीने जाणूनबुजून केला उशीर

जॅक क्रॉली जाणूनबुजून फलंदाजीसाठी पवित्रा (स्टान्स) घेण्यास वेळ लावत होता. इतकेच नव्हे, तर एकदा त्याने बुमराहला धाव घेतल्यानंतर (रन-अप) गोलंदाजी करण्यापासून रोखले. षटकातील पाचव्या चेंडूवर क्रॉलीने बचावात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू त्याच्या ग्लोव्हजला लागला. यानंतर त्याने तात्काळ ड्रेसिंग रूमकडे इशारा करत फिजिओला मैदानात बोलावले. त्याच्या या कृतीमुळे शुभमन गिल भडकला.

शुभमन गिल संतापला, बुमराह-सिराजनेही उडवली खिल्‍ली

गिल थेट क्रॉलीकडे गेला. त्‍याने वेळकाढूपणावर टिप्पणी केली. हे पाहून डकेटही तिथे आला आणि त्याने भारतीय कर्णधाराला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत बुमराह आणि मोहम्मद सिराजही स्लेजिंगमध्ये सामील झाले होते. त्यांनी उपहासात्मक टाळ्या वाजवत इंग्लिश फलंदाजांना डिवचले. यामुळे मैदानातील वातावरण आणखीच तापले, परंतु पंचांनी वेळीच मध्यस्थी करून अखेरचा चेंडू टाकायला लावला आणि दिवसाचा खेळ संपल्याचे जाहीर केले.

IND vs ENG 3rd Test :
IND vs ENG 3rd Test Day 1 : बुमराहने ब्रूकची केली शिकार! त्रिफळाचीत करून तंबूत धाडले; इंग्लंडला चौथा झटका
IND vs ENG 3rd Test :
IND vs ENG 3rd Test : क्रिकेटच्या पंढरीत वर्चस्वाची लढाई, सीमर्सचा चक्रव्यूह भेदण्याचे नवे आव्हान

सिडनी कसोटीतही बुमराह-कोंस्‍टासमध्‍ये शाब्दिक चकमक

अशाच प्रकारची एक घटना बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी दरम्यान सिडनी कसोटीत घडली होती. सिडनी कसोटीत दिवसाच्या शेवटच्या षटकात जसप्रीत बुमराह आणि कोंस्टास यांच्यात वाद झाला होता. आणखी एक षटक खेळावे लागू नये म्हणून कोंस्टास 'डिले टॅक्टिक्स' वापरून सामन्याचा वेग कमी करत होता. यावरुन बुमराहला भडकला अणि कोंस्‍टास भिडला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news