IND vs ZIM 2nd T20 : दुसऱ्या T20 मध्ये भारताचा झिम्बाब्वेवर ९० धावांनी दणदणीत विजय

झिम्बाब्वेच्‍या फलंदाजांची पुन्‍हा हाराकिरी, टीम इंडियाची मालिकेत २-० ची अजेय आघाडी
IND vs ZIM 2nd T20
IND vs ZIM 2nd T20BCCI X
Published on
Updated on

IND vs ZIM 2nd T20 : भारताने दुसऱ्या T20 सामन्यात जिम्बाब्वेचा ९० धावांनी दारूण पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी अजेय आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २० षटकांत ५ बाद २१९ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरादाखल २२० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना जिम्बाब्वेचा पूर्ण डाव १७.५ षटकांत अवघ्या १२९ धावांत गारद झाला. झिम्बाब्वेची फलंदाजी अत्यंत खराब झाली असून संपूर्ण सामन्यात त्यांचा एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकला नाही. मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना रविवारी खेळवला जाणार आहे.

अभिषेक शर्माची अष्टपैलू चमक; गोलंदाजीत टिपले ३ बळी

झिम्बाब्वेसाठी ब्रायन बेनेटने सर्वाधिक ३२ धावा केल्या. याशिवाय तदिवानाशे मारुमणी (२४), रेयान बर्ल (२०) आणि ब्रॅड इव्हान्स (१९) यांनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली.भारताकडून फिरकीपटू अभिषेक शर्माने चमकदार कामगिरी करत सर्वाधिक ३ बळी घेतले. तर यश ठाकूर आणि प्रिन्स यादव यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. याशिवाय रवी बिश्नोई, शिवम दुबे आणि तिलक वर्मा यांनी प्रत्येकी १-१ बळी टिपत जिम्बाब्वेच्या डावाला सुरुंग लावला.

IND vs ZIM 2nd T20
Vaibhav Sooryavanshi Fifty : वैभव सूर्यवंशीचे तुफानी अर्धशतक, सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत

इशान किशन आणि तिलक वर्माची धडाकेबाज अर्धशतके

तत्पूर्वी, इशान किशन आणि तिलक वर्मा यांच्या तुफानी अर्धशतकांच्या जोरावर भारताने धावफलकावर २१९ धावांचे विशाल आव्हान उभारले. दोघांनी चौथ्या विकेटसाठी ९४ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली.इशान किशन ४४ चेंडूंत ९ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ८१ धावा केल्‍या. तिलक वर्माने २९ चेंडूंत ५ चौकार आणि ३ षटकारांच्या जोरावर ६० धावा (नाबाद) केल्‍या. त्याआधी इशानने कर्णधार श्रेयस अय्यरसोबत तिसऱ्या विकेटसाठी ६६ धावा केल्‍या. श्रेयसने २५ तर युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने २० धावांचे योगदान दिले. रिंकू सिंह (१२) आणि अभिषेक शर्मा (८) स्वस्तात बाद झाले, तर शिवम दुबे ६ धावांवर नाबाद राहिला. झिम्बाब्वे कडून ब्लेसिंग मुझरबानी, रिचर्ड नगारवा, ब्रॅड इव्हान्स, न्यूमन नयामहुरी आणि ब्रायन बेनेट यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केला.

IND vs ZIM 2nd T20
Team India schedule : टीम इंडिया इंग्लंडनंतर ‘या’ देशाविरुद्ध खेळणार ODI सामने, सप्टेंबरमध्ये रंगणार ३ सामन्यांची मालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news