IND vs WI भारताचे लक्ष्य मालिका विजयाचे

IND vs WI  भारताचे लक्ष्य मालिका विजयाचे
Published on
Updated on

अहमदाबाद :  पुढारी वृत्तसंस्था भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध बुधवारी होणार्‍या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात मालिका जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. तेव्हा पुनरागमन करत असलेल्या उपकर्णधार के. एल. राहुलवरदेखील लक्ष असणार आहेत. भारताने युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या गोलंदाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजला पहिल्या एकदिवसीय सामन्यात 176 धावांवर रोखले. यानंतर कर्णधार रोहित शर्माने 60 धावांच्या मदतीने भारताने सहा विकेटस्ने विजय मिळवला. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका दौर्‍यातील अपयशाला मागे टाकत चांगली कामगिरी केली. रोहितचा प्रयत्न आपला फॉर्म कायम ठेवण्याचा असणार आहे. रोहितसोबत ईशान किशनने 36 चेंडूंत 28 धावा केल्या. त्यामुळे राहुलचे पुनरागमन झाल्यास तो कुठल्या स्थानी फलंदाजी करतो हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे. (IND vs WI)

राहुल वैयक्तिक कारणामुळे पहिला सामना खेळला नव्हता. त्याने डावाची सुरुवात केल्यास ईशान किशनला बाहेर जावे लागू शकते. राहुल मध्यक्रमाला फलंदाजीस आल्यास दीपक हुड्डा बाहेर होऊ शकतो. संघ व्यवस्थापन विराट कोहली, ऋषभ पंत आणि सूर्यकुमार यादव यांच्या क्रमात बदल करणार नाही. कोहलीसाठीदेखील हा सामना महत्त्वाचा असणार आहे. गोलंदाजीत चहल व वॉशिंग्टनने चांगली कामगिरी केली. कदाचित एक स्पिनर बाहेर ठेवून व्यवस्थापन कुलदीप यादवला संधी देऊ शकते. दुसरीकडे, वेस्ट इंडिजचा प्रयत्न या लढतीत चांगली कामगिरी करण्याचा असेल. कायरन पोलार्डला संघाच्या कामगिरीत सुधारणा करावी लागेल आणि फलंदाजांना जबाबदारी घ्यावी लागेल. वेस्ट इंडिजला आक्रमक फलंदाज निकोलस पूरन आणि पोलार्डकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.

शिखर धवन, श्रेयस अय्यरची चाचणी निगेटिव्ह

धवन आणि श्रेयस अय्यर यांची कोव्हिड चाचणी निगेटिव्ह आली आहे, तर ऋतुराज गायकवाड अजूनही आयसोलेशनमध्ये आहे. ते दोघे प्रशिक्षण शिबिरात सहभागी होऊ शकतात. धवन आणि अय्यर मंगळवारी भारतीय संघासोबत संध्याकाळच्या सराव सत्रात सहभागी झाले. भारतीय संघाचे चार खेळाडू शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर आणि नवदीप सैनी हे पहिल्या वन-डे सामन्यापूर्वी कोव्हिड पॉझिटिव्ह आढळले होते. त्यामुळे हे खेळाडू पहिल्या वन-डेच्या प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर होते. (IND vs WI)

हेही वाचलतं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news