

Virat Kohli Dhoni RX100
रांची: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेपूर्वी रांची पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे. भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने माजी कर्णधार एम एस धोनीच्या घरी भेट दिल्यानंतर, दोघांचे नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये विराट कोहली धोनीच्या आयॉनिक Yamaha RX 100 मोटारसायकलवर बसलेला दिसत आहे, तर धोनी त्याच्या बाजूला हसत उभा आहे.
या भेटीतील कोहली आणि धोनीचा एक क्लोजअप सेल्फी देखील प्रचंड व्हायरल झाला आहे. या सेल्फीत त्यांच्यामधील जुन्या आणि घट्ट मैत्री दिसून येते. आणखी एका फोटोत, हे दोघे एका मित्रासोबत घराबाहेर निवांत गप्पा मारताना दिसतात.
दरम्यान, महेंद्रसिंग धोनीने गुरुवारी विराट कोहली आणि ऋषभ पंतला आपल्या घरी डिनरसाठी बोलावले होते. डिनरनंतर धोनीने स्वतः गाडी चालवत विराट कोहलीला हॉटेलवर सोडले. सोशल मीडियावर हा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका गमावल्यानंतर आता यजमान भारतीय संघ पाहुण्या द. आफ्रिकेविरुद्ध वन डे आणि टी-२० मालिका खेळणार आहे. तीन सामन्यांच्या वन डे मालिकेची सुरुवात ३० नोव्हेंबर पासून होत असून, टी-२० मालिका ९ डिसेंबरपासून खेळली जाईल. दरम्यान, वन डे मालिकेत कर्णधार शुभमन गिल मानेच्या दुखापतीमुळे खेळणार नाही. त्यामुळे रोहित शर्मासोबत सलामी जोडीदाराच्या भूमिकेत ऋतुराज गायकवाड किंवा यशस्वी जैस्वाल यापैकी कोणाला संधी मिळते, याकडे उत्सुकता आहे.